गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोदींच्या आवाजाची नक्कल करणा-या तरुणाच्या व्हिडिओने धुमाकुळ घातला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुमच्यापर्यंतही पोहचला असलेच. मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कल आतापर्यंत खचितच कोणी केली असेल त्यामुळे मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करणारा हा मिमिक्री आर्टिस्ट रातोरात प्रसिद्ध झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : २ हजारांच्या नोटेवरही ‘बेवफा’ सोनम

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ‘सोनम गुप्त बेवफा है’ च्या चर्चा रंगल्या. इतकेच नाही तर सोनमच्या बेवफाईचे चर्चे  क्रिकेटच्या मैदानात देखील पाहायला मिळाले. आता सोनमच्या बेवफाईचे चर्चे जर मोदींच्या कानावर गेले तर त्यांना काय वाटेल याची उत्तम मिमिक्री या कलाकाराने करून दाखवली आहे. त्यामुळे या व्हिडिओला अधिकच पसंती मिळत आहे. हा आवाज आणि मोदींच्या बोलण्याची शैली या तरूणाने इतकी उत्तम पकडली आहे की  फक्त आवाज ऐकला तर मोदीच बोलत आहेत की काय असा भास सगळ्यांना होईल. या मिमिक्री आर्टिस्टचे नाव आहे श्याम रंगीला. २१ वर्षे वय असलेला श्याम शाळेत असल्यापासून अनेकांच्या आवाजाची नक्कल करत आहेत. राजस्थानमधल्या गंगानगर जिल्ह्यात एका छोट्याश्या खेड्यात त्याचा जन्म झाला. २००४ पासूनच शाळेच्या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या नक्कला करत त्यांनी प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर गावागावात नक्कलाचे छोटे मोठे कार्यक्रम करत त्याने नाव कमावले. गेल्यावर्षी देखील त्यांनी मोदींची नक्कल केली होती. त्यामुळे त्याला अनेकजण ‘राजस्थानचा नमो’ या नावानेच ओळखतात. मोदी जर पाणीपुरी खात असतील तर ते कसे बोलतील असा तो व्हिडिओ होता.

श्यामचे अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आवाजातले व्हिडिओ फेसबुक, युट्यबवर आहेत. शाहारूख खान, परेश रावल, सुनील शेट्टी अशा अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आवाजाची नक्क तो करतो. त्याला कॉमेडिअन व्हायचे आहे. मोदींच्या दोन तीन भाषणांना त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच मोदींच्या आवाजांची नक्कल करण्याचा ध्यास त्याने घेतला. एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्यामने मोंदींना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. जर मोदींना भविष्यात कधी भेटण्याचा योग आलाच तर त्यांच्याच आवाजाची नक्कल करत आपण संवाद साधू असेही श्यामने बोलून दाखवले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची जगभरात चर्चा होत आहेत अशातच सोशल मीडियावर विस्मरणात गेलेल्या सोनम बेवफा हे या विनोदाने डोके वर काढले. नेटीझन्स या सोनमला हुडकून काढण्यासाठी डोक्यावर ताण देत आहेत. जर सोनमच्या चर्चा मोदींच्या कानावर पडल्या तर त्यांना काय वाटेल याचा व्हिडिओ तुम्ही देखील पाहायला हवा. बघा तुम्हालाही आवडतोय का!

वाचा : नोटाबंदीवर थेट मोदींकडे मांडा तुमचे मत!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best narendra modi mimicry by shyam rangeela
First published on: 25-11-2016 at 11:39 IST