Lizard Viral Video : दातांच्या स्वच्छतेसाठी तुमच्यापैकी प्रत्येकजण टूथब्रशचा वापर करत असतील. काही लोकांना जास्त वेळ ब्रशने दात घासण्याची सवय असते. पण, दात घासून झाल्यानंतर अनेकजण ब्रश बाथरुमधील रॅकमध्ये स्वच्छ धुवून ठेवतात. काही जण ब्रश धुतल्यानंतर त्याला प्लास्टिक कव्हर लावून ठेवतात. पण, अनेकजण ब्रश तसाच कव्हरशिवाय बाथरुममध्ये ठेवतात. जर तुम्हीही अशाप्रकारे ब्रश बाथरुममध्ये प्लास्टिक कव्हरशिवाय ठेवत असाल तर सावध व्हाल. कारण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक पाल उघड्यावर ठेवलेल्या टूथब्रशबरोबर नेमकं काय करतेय हे दिसतेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

वारंवार सांगितलं जातं की, किचनमध्ये कोणताही पदार्थ उघडा ठेवू नका, अन्यथा त्यात पाल पडू शकते किंवा ती चाटून जाऊ शकते. पण, पाल फक्त किचनच नाही तर बाथरुममधील वस्तूंनाही चाटून जाते. तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा.

या व्हिडीओत दिसतेय की, बाथरुममधील बॉक्समध्ये ठेवलेला एक टूथब्रश पाल आरामात जिभेने चाटताना दिसतेय. हा ब्रश जर तुम्ही न धुता किंवा स्वच्छ करता वापरलात तर आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाथरुममध्ये उघड्यावर ठेवलेला ब्रश न धुता वापरण्याची चूक तुम्ही करू नका, कारण पालीसारखे अनेक कीटक तो ब्रश केव्हा चाटून जातील ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Chanchal Bhatia (@impinkaji)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टूथब्रशचा हा भयानक व्हिडीओ @impinkaji नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, रात्री मी वॉशरूमसाठी उठले.. अचानक हे दृश्य पाहून मला धक्काच बसला.. देवा असे शत्रूबरोबरही घडू नये. दरम्यान, या व्हिडीओवर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हे फार भयानक दृश्य आहे. दुसऱ्याने लिहिले की, सकाळी सकाळी मूड खराब केला.