Viral Wedding Dance 2025: लग्नसमारंभ म्हटलं की आता केवळ विधी नव्हे, तर धमाल डान्सचे कार्यक्रमही अनिवार्य झाले आहेत. विशेषतः घरातील महिलांचाही सहभाग यात लक्षणीय वाढला आहे. जेव्हा संपूर्ण घर सांभाळणाऱ्या महिला रंगमंचावर उतरून डान्स करताना दिसतात, तेव्हा ती एक प्रेरणादायक आणि उत्साही झलक ठरते. सध्या अशाच एका लग्नातील हळदी समारंभात वहिनींचा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यांच्या ठसकेबाज स्टेप्स आणि आत्मविश्वासाने भरलेल्या परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यात एका वहिनींचा ठसकेबाज आणि दिलखुलास डान्स पाहून नेटिझन्स अक्षरशः फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ नवीन नाहीत, पण हा व्हिडीओ काहीसा हटके आहे, कारण यामध्ये आहे ग्लॅमर आणि धमाल. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांची पर्वा न करता या वहिनी बिनधास्त नाचत आहेत.

प्रोत्साहनाने डान्सच्या खुमारीत भर

इन्स्टाग्रामवर didsupermoms_ridditiwari_ या युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोन महिला विवाहसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमात स्टेजवर नाचताना दिसतात. “चोली के पीछे क्या है” या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर त्या दोघी ज्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने नाचतात, ते खरंच पाहण्यासारखे आहे. व्हिडिओमधल्या वहिनींच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. उपस्थित महिलांनी, नातेवाईकांनी टाळ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि संपूर्ण स्टेज आनंदाने बहरून गेला.

नेटिझन्स झाले वहिनींचे फॅन!

व्हिडीओ अपलोड होताच काही तासांत त्याला हजारो व्ह्युज मिळाले. सध्या या व्हिडीओला ३४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून, व्हायरल होत असलेला डान्स व्हिडीओ पाहून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वहिनींच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. कोणी म्हणालं, “वहिनीने स्टेज फोडलाच!”, तर कोणी लिहिलं, “आईशप्पथ! मजा आली!”, या डान्सनंतर अनेकांनी त्यांना “रिअल डान्स क्वीन” असंही म्हटलं आहे, अशा प्रकारच्या वेगवेळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ केवळ मनोरंजन नाही, तर महिलांनी आनंदाने आणि आत्मविश्वासाने स्टेज गाजवल्याचं उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक कार्यक्रमात असा धम्माल अंदाज पाहणं म्हणजे एक भन्नाट अनुभव. तुम्ही अजूनही पाहिला नाही का हा व्हिडीओ? मग वेळ न दवडता क्लिक करा आणि अनुभव घ्या त्या डान्सचा धमाका