Big Shark Stuck In Fishing Net Video Viral : एडी कैरोल नावाचा मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला होता. ब्लूफिश टूर्नामेंटमध्ये सहभाग घेण्याच्या इराद्यात तो व्यक्ती मासेमारी करत होता. मात्र, मासेमारी दरम्यान या मच्छीमाराला पाण्यात टाकलेल्या गळाला छोटे मासे मिळाले नाहीत. तर चक्क एक विशाल शार्क गळाला लागल्याचं त्यानं पाहिलं. पॅडलबोर्डवर बसून मिस्टर कॅरोल समुद्राच्या पाण्यात गेला होता. त्यावेळी एक मोठा शार्क मासा गळात अडकल्याने कॅरोलला १२ फूट पॅडल बोर्डला पाण्यातून खेचावं लागलं. मासेमारीचा हा थरारक व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मच्छीमार कॅरोलने एनबीसी कनेक्टिकटशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, टूर्नामेंट जिंकण्यासाठी ही एक मोठी संधी असेल, असा मला वाटत होतं. परंतु, या माशाने मला समुद्राच्या पाण्यात जोरात खेचलं. त्यामुळे माशासोबत मला जवळपास १ तास संघर्ष करावा लागला. मात्र, खूप प्रयत्न केल्यानंतर मासा पकडण्यात यशस्वी झालो. त्यानंतर किनाऱ्यावर माशाला आणलं आणि मला धक्काच बसला. कारण गळाला अडकलेला मासा ब्लूफिश किंवा छोट्या प्रजातीचा मासा नव्हता, तर तो मासा विशाल शार्क होता.

इथे पाहा शार्क माशाचा खतरनाक व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Eddie Carroll (@edcarroll05)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅरोलने म्हटलं, या माशाचा आकार पाहण्यासाठी मी त्याला जवळून पाहिलं, त्यावेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला. जवळपास ८ फूट लांबीच्या या शार्क माशाने नाकी नऊच आणले होते. शार्क माशाचं हे थरारक दृष्य कॅमेरात कैद केलं असून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत कॅरोलने म्हटलं की, हा मासा पकडल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.