Suraj Chavan Dialogue Video: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता रील्सस्टार सूरज चव्हाणवर आता राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही आता त्याचेच व्हिडीओ पाहायला मिळत आहे. कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांकडूनही त्याला कौतुकाची थाप मिळत आहे. एक रील्सस्टार म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा सूरज चव्हाण त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याने आयुष्यात केलेला संघर्ष यांमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. अख्ख्या महाराष्ट्राने आता त्याला उचलून डोक्यावर घेतलं आहे. बिग बॉसमधील सूरजच्या गेमबरोबर त्याचे डायलॉग्जही खूप प्रसिद्ध झाले. झापुक झुपूक, बुक्कीत टेंगुळ, गुलिगत पॅर्टन या सूरजच्या डायलॉग्जनी तर अनेकांनी वेड लावलंय. अशातच एका ६५ वर्षांच्या काकूंनी सूरजच्या भन्नाट डायलॉगबाजीला अशी काय टक्कर दिली आहे की, ऐकून दोन मिनिटं सूरजपण स्वत:चेच डायलॉग विसरून जाईल. या काकूंनी सूरज चव्हाणचा असा एक डायलॉग म्हणून दाखवला आहे, जो ऐकून उपस्थित लोकही जोरजोरात हसू लागले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, काकूंच्या डायलॉगबाजीला तोड नाही.

काकूंचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणे होईल कठीण

सूरजचा गुलिगत पॅटर्न आता महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात गाजतोय; पण सूरजची ही हवा फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती परदेशांतही जाऊन पोहोचलीय. विशेषत: त्याच्या डायलॉगबाजीचे अनेक जण फॅन झालेत. आता या व्हिडीओमध्येच पाहा ना, एका ६५ वर्षांच्या काकींनीसुद्धा सूरजचा एक प्रसिद्ध डायलॉग आपल्या स्टाईलने म्हणून दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही. कारण- व्हि़डीओमध्ये डायलॉग बोलताना काकी आपले असे काही शब्द त्यात अॅड करतात की, ते ऐकून उपस्थितही विचारात पडतात.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मंडपात महिलांसाठी पैठणीचा खेळ रंगतोय. या कार्यक्रमात एका ६५ वर्षांच्या काकूंनीही सहभाग घेतला आहे. यावेळी काकूंची एनर्जी तर कौतुकास्पद होतीच; पण त्यांनी सूरज चव्हाणचा म्हटलेला डायलॉग आणि त्यावर केलेला डान्स तर त्याहून जबदरस्त आहे. तुम्ही पाहू शकता की, काकू हातात माईक धरून डायलॉग म्हणायला सुरुवात करतात, “झापुक झुपूक, झापुक झुपूक, एस क्यू आर क्यू झेड क्यू, गनिमित धोका, बुक्कीत टेंगूळ…” काकींनी गुलिगत धोकाऐवजी गनिमित धोका, असे म्हणताच उपस्थित लोकही हसू लागले. पण, काहीपण म्हणा काकूंनी ज्या प्रकारे हा डायलॉग म्हणून दाखवला त्याला काही तोड नाही.

६५ वर्षांच्या काकूंनी डायलॉगबाजीत सूरज चव्हाणला टाकलं मागे!

Ratan Tata Lifestyle : रतन टाटा तरुणपणी कसे दिसायचे? पाहा त्यांचे ‘हे’ १० दुर्मिळ फोटो अन् त्यामागच्या आठवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @sushilsuryawanshi05 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून, अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणी म्हणतेय, गनिमित धोका, बाईSS… हा काय प्रकार, तर कोणी म्हणतेय, मस्त भारी अभिनय केला काकी… अशा प्रकारे युजर्स हा व्हिडीओ पाहून खूप हसतायत. पण, तुम्हालाही काकींचा हा जबदरस्त डायलॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा.