Big Venomous Sea Snake Found : साप समोर दिसला की अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. अशातच तो साप जर विषारी तर अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. अजगर, अॅनाकोंडा किंवा किंग क्रोब्रा सापाच्या जवळ जायला भल्या भल्यांची हवा टाईट होते. क्वीन्स सनशाईन कोस्टवर अशाच प्रकारचा एक खतरनाक आणि महाकाय विषारी साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांना हा साप दिसला. सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्सने सांगितलं की, हा साप जखमी झालेल्या अवस्थेत होता.

स्टीवर्ट मॅकेंजीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हा साप नक्कीच अस्वस्थ होता. त्या सापाच्या अंगावर मोठी जखम होती. कोणत्या तरी धारदार वस्तूने या सापाचा एक भाग कापला गेला असेल. सापाला वाचवणं शक्य आहे का, याबाबत माझा गोंधळ उडाला होता. पण मी त्या सापाला वन्य प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हा विशाल साप कमीत कमी १० वर्षांचा असू शकतो. याचं वजन २-४ किलो आणि १ मीटरहून जास्त लांब आहे.

नक्की वाचा – मॉं तुझे सलाम! अचानक घराचं छत कोसळलं, पण आईने बाळाला वाचवलं, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स २४/७ ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समुद्र किनारी आढळणाऱ्या सापांपासून दूर राहण्याचं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पोस्ट शेअर करताना म्हटलंय की, समुद्री सापांना उचलून त्यांना पुन्हा समुद्रात फेकण्याचा प्रयत्न करु नका. समुद्री साप खूप विषारी असतात आणि त्यांना सर्वमित्रच हाताळू शकतात. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना यूजर्सने आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या. एकाने म्हटलं की, समुद्री साप एवढे मोठे असतात, मला माहित नव्हतं. अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, हा साप किती वर्षांपूर्वीचा आहे, याची माहिती मिळेल का? हा खूप मोठा साप आहे आणि तो खूप वर्षांपूर्वीचा वाटत आहे आणि तो मरणाच्या उंबरठ्यावर असल्यासारखं दिसत आहे.