पहिलं लग्न झालेलं असूनही दुसऱ्या लग्न करायला एक माणूस गेला आणि मार खाऊन परतल्याची घटना घडली आहे. बिहारमधली ही घटना आहे. या माणसाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना बिहारमधल्या गया या ठिकाणी असलेल्या इकबाल नगर भागातली आहे. हा माणूस विग लावून दुसरं लग्न करण्यासाठी डोभी या ठिकाणी गेला. त्यावेळी मुलीकडच्या लोकांना नवऱ्या मुलाविषयी संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर मुलीकडच्यांना समजलं की या माणसाला केस नाहीत. तो विग लावून तिथे आला आहे. त्यानंतर या नवरदेवाची मुलीकडच्यांनी जबरदस्त धुलाई केली.
या माणसाने विग लावला आहे हे समजल्यावर तर मुलीकडच्या लोकांच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी त्याला तिथेच बदडायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. बिहार तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडीओत जे दिसतं आहे त्यानुसार या नवऱ्या मुलाला मुलीकडच्यांनी पकडून ठेवलं होतं. एका वृद्ध व्यक्तीने त्याला थोबाडीत ठेवून दिली. तू आज आमच्या गावात आला आहेस म्हणून वाचला आहेस, दुसऱ्या गावात गेला असतास तर लक्षात घे तुझं काय झालं असतं? असं लोक त्याला म्हणताना दिसत आहेत. तर यानंतर हा माणूस त्याला मारणाऱ्यांकडे दया याचना करताना दिसतो आहे. तेवढ्यात कुणी तरी सांगतं की याचे केस काढा. तेव्हा समजून येतं की हा माणूस तर विग लावून लग्न करायला आला होता. ज्यानंतर त्याला पुन्हा मारहाण सुरु होते.
इकबाल नगर भागात राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की ज्या माणसाला फटके पडले तो माणूस विग लावून दुसरं लग्न करायला आला होता. तो मुलीच्या घरातल्यांची फसवणूक करत होता. त्यामुळे त्याला मुलीकडच्यांनी फटके दिले आहेत. जेव्हा लोकांचा राग शांत झाला तेव्हा त्याला त्याच्या गावी परत पाठवण्यात आलं आहे.