लग्नानंतर अनेक जोडपी हनिमूनला जातात, यासाठी ते आवडत्या ठिकाणी जायचं ठरवतात. पण सध्या हनिमूनला निघालेल्या एका जोडप्याशी संबंधित एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एक जोडपे दार्जिलिंगला हनिमूनसाठी जात असतानाच अर्ध्या रस्त्यातून बायको बेपत्ता झाली आहे. बोयको बेपत्ता झाल्याने पती घाबरला आणि पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली, धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांनी पत्नी तब्बल एक हजार किमी अंतरावरील गुरुग्राममध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे.

मुझफ्फरपूरचे रहिवासी प्रिन्स कुमार याच्या म्हणण्यानुसार, तो पत्नी काजल कुमारीसोबत नवी दिल्ली-न्यू जलपाईगुडी या रेल्वेत चढला होता. दरम्यान, बायको किशनगंज रेल्वे स्थानकावरील वॉशरूममध्ये गेली आणि परत आलीच नाही. बराच वेळ झाला तरीही काजल न आल्याने पतीने जीआरपीला याबाबत माहिती दिली त्यानंतर सरकारी रेल्वे स्थानकावर एफआयआर नोंदवण्यात आला.

हेही पाहा- PM नरेंद्र मोदी आणि CM योगींच्या बहिणींची झाली भेट, Video पाहताच नेटकरी करतायत साधेपणाचं कौतुक

थेट गुरुग्राममध्ये सापडली बेपत्ता बायको –

किसनगंज पोलिसांना गुरुग्राममधून काजलच्या शोधाची माहिती देण्यात आली. यानंतर किशनगंज जीआरपीचे पोलीस काजलला ताब्यात घेण्यासाठी निघाले, तर राजकुमारच्या कुटुंबीयांनाही मुजफ्फरपूरहून किशनगंजला बोलावण्यात आले. जिथे काजलला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार, काजल किशनगंजहून गुरुग्रामला कशी पोहोचली, याबाबत काहीच सांगत नाहीये.

हेही पाहा- फणा काढलेल्या नागाला गायीने प्रेमाने चाटलं अन्…, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला दुर्मिळ Video पाहून थक्कच व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिन्सच्या म्हणण्यानुसार, त्याचा विवाह फेब्रुवारी महिन्यात झाला होता. कौटुंबिक कारणांमुळे ते लग्नानंतर हनिमूनला जाऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी दार्जिलिंगला जाण्याचा प्लॅन केला होता, पण दार्जिलिंगला पोहोचण्यापूर्वीच काजल बेपत्ता झाली आणि सुमारे एक हजार किमी दूर असलेल्या गुरुग्राममध्ये ती सापडली. त्यामुळे आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, काजल गुरुग्रामला पोहोचली कशी? जीआरपीने काजल सोपडल्याची माहिती दिली आहे, तर इतर प्रश्नांवर जीआरपीने सांगितलं की, काजल आल्यानंतरच सर्व काही उघड स्पष्ट होईल. ती सापडल्याची माहिती मिळताच किशनगंज रेल्वे पोलीस गुरुग्रामला रवाना झाले आहेत.