कर्जबाजारीपणाला कंटाळून एका फळ व्यापाऱ्याने संपुर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे, तर एक मुलगी गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

घर खर्चासाठी किंवा धंद्यासाठी पैसे कमी पडत असतील तर अनेक लोकं बँकेतून कर्ज काढण्याचा मार्ग निवडतात. मात्र, तत्काळ पैसे पाहिजे असतील तर मग अनेकजण बँक सोडून उसणवारीने किंवा टक्केवारीवर पैसे घेतात. मात्र, हे पैसे खूप जास्त व्याजाने त्यांना घ्यावे लागतात आणि घेतलेले पैसे वेळेवरती परत केले नाही. तर मग कर्ज देणारा त्या पैशांसाठी कर्जदाराकडे सतत तगादा लावतो.

आणखी वाचा- १४ लाखांची बॅग चोरून पळत होता चोर, मात्र अशी घडली अद्दल की आयुष्यात विसरणार नाही; पाहा Viral Video

याच त्रासाला कंटाळून अनेक जण आपलं आयुष्य संपतात अशा आपण बातम्या वाचल्या आहेत. पण सावकाराच्या तगाद्याला कंटाळून एका कुटुंब प्रमुखाने संपुर्ण कुटुंब उद्धवस्त केल्याची धक्कादायक घटना बिहार मध्ये घडली आहे. बिहारमधील विजय बाजार येथे फळांचा व्यापार करणाऱ्या केदार लाल गुप्ता यांनी आपल्या पत्नीसह चार मुलांना विष पाजूत आत्महत्या केली आहे.

आणखी वाचा- संतापजनक! एकतर्फी प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकलं अन्…

मात्र या घटनेत एक मुलगी बचावली असून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केदार यांच्यावरती १० ते १२ लाखाचं कर्ज होतं. कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकाराने त्यांच्यामागे तगादा लावला होता. सावकाराच्या याच सततच्या त्रासाला कंटाळून केदार याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना विष पाजूत स्वत:चही आयुष्य संपवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घरातील सदस्यांनी विष प्यायच्या आधी केदार यांचा मुलगा प्रिंसने एक व्हिडीओ देखील काढला होता. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, “वडिलांनी बाजारातील काही लोकांकडून पैसे घेतले होते. ते वसूल करण्यासाठी ते सतत त्रास द्यायचे, आम्ही पैसे फेडण्यासाठी काही वेळ मागितला होता पण त्यांनी तो दिला नाही. शिवाय त्यांनी धमकी देखील दिली या सर्व त्रासाला कंटाळून आम्ही विष पिलं” या प्रकरणावर पोलिसांनी मात्र काही प्रतिक्रिया दिलेली नसून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.