बिहारमधील आरजेडीच्या समर्थकांनी एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहार भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलर शेअर करत भाजप नेते निखिल आनंद आणि लालन सिंह यांनी आरजेडीवर निशाणा साधला आहे. बिहारमधील मोकामा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आरजेडी उमेदवार नीलम देवी या विजयी झाल्या आहेत.
आणखी वाचा- कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील ५ सदस्यांची आत्महत्या; मृत्यूआधी मुलाने व्हिडीओद्वारे मांडली व्यथा
मोकामा मधील पोटनुवडणुक जिकंताच आरजेडीची गुंडागर्दी सुरु झाली असल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात येत आहे. कारण एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चप्पला शिवणाऱ्या व्यक्तीला लाथा बुक्यांनी मारहाण करत त्याच्या छातीवर चप्पल ठेवत त्याला जिवे मारण्याची धमकी देत आहे. शिवाय यावेळी चप्पला शिवणाऱ्या व्यक्तीला जातीवाचक शिव्या दिल्याचा दावा देखील केला जात आहे. या व्हिडीओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती “मोकामा निवडणूक जिंकली आहे चप्पलेने मारेन” असं म्हणताना दिसतं आहे.
या घटनेचा व्हिडीओ बिहार भाजपाने ट्विट करत आरजेडीवर निशाणा साधला आहे. शिवाय केवळ मोकामा येथील पोटनिवडणूनक जिंकली तर ही परिस्थिती आहे. जर संपुर्ण बिहार जिकंला तर गरिबांचे काय हाल होतील याचा विचार करा असं देखील भाजपकडून ट्विटमध्ये लिहलं आहे. मोकामा क्षेत्रामध्ये गुंडांचे वर्चस्व असल्याचं बोललं जातं. मात्र, त्याचा प्रत्येय देखील आता या घटनेमुळे नागरिकांना आला आहे.
दरम्यान, भाजप नेते निखिल आनंद म्हणाले की, एकेकाळी आरजेडीचे लोक मोकामामध्ये पुटुस यादव यांना न्याय मिळवून देण्याची चर्चा करायचे. लालू प्रसाद यादव गांधी मैदानातून ओरडत होते की, पुटुस यादव यांची नखे उपटून हत्या करण्यात आली. अशी टीका करायचे त्याच आरजेडीने अनंत सिंह यांच्या मांडीवर बसून मोकामाची निवडणूक जिंकली अशी टीका आनंद यांनी केली आहे.