Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नागमोडी वळणाचा रस्ता आहे, दोन मुले बाईक चालवतायत. एक जण पुढे आणि एक जण मागे आहे. यावेळी इतक्या वळणावळणाच्या रस्त्यावरही हा तरुण अतिशय वेगाने बाईक चालवतोय.

दरम्यान, त्याला समोरून येणाऱ्या ट्रकची जराही कल्पना नसताना ट्रेक येतो आणि त्याने वेळीच कट मारला म्हणून, नाही तर बाईक आणि ट्रकची समोरा-समोर धडक झाली असती. तरीही ट्रक बाईकला घासून गेल्यामुळे बाईकवरील तरुण फरफटत जाऊन जोरदार कोसळतो. त्याची बाईक एकीकडे आणि तो एकीकडे असा अपघात होतो. सुदैवाने ट्रकची चाकं त्याच्या अंगावरून वरून गेली नाही. त्यामुळेच त्याचा जीव बचावला. व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हृदयस्पर्शी! कांगारुच्या तावडीतून कुत्र्याला वाचवण्यासाठी देवदूत बनला मालक; बघा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @queen_of_valley नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.