Video : तरुणांचे गीर अभयारण्यात संतापजनक वर्तन

अभयारण्याने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभयारण्याने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असेलल्या गुजरातमधल्या गीर अभयारण्यातला धक्कादायक व्हिडिओ ‘ गुजरात फॉरेस्ट’ या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यात काही टवाळ पर्यटक जंगलात शिरून सिंह-सिंहिणीला त्रास देत आहेत.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभयारण्य प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जंगलात मुक्तपणे फिरत असलेल्या सिंहांचा काही टवाळखोर तरुणांनी मोटार सायकलवरून पाठलाग केला. सिंहाला हुसकावून लावल्यानंतर तरुणांनी मोर्चा सिंहिणीकडे वळवला. ही मुलं सिंहिणीचा बाईकवरून पाठवलाग करून तिला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले. बाईकच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने याचा व्हिडिओही चित्रित केला. सिंहांना जंगलात पिटाळून लावल्यानंतर हे तरुण माघारी फिरले. केवळ मजेसाठी आणि सिंहाना त्रास देण्यासाठी काढलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता या तरुणांचा शोध पोलीस घेत आहे. हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आला होता याची माहिती समोर आलेली नाही. बाईकच्या नंबरच्या आधारे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.

वडील झोपेत असताना ९ वर्षांच्या मुलीने फोनवरून बुक केली डिस्नेलॅण्डची ट्रीप

जसा देश तसा वेश!, टेनिसपटू रॉजर फेडरर कोर्टवर चक्क ‘किल्ट’मध्ये अवतरला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Biker chases lion in gir sanctuary gujrat

ताज्या बातम्या