Blinkit Delivery Agent Caught Urinating Inside Lift :सोशल मीडियावर ब्लिकंइट, झोमॅटो, स्विगी अशा घरपोहच वस्तू, खाद्यपदार्थ देणाऱ्या कंपन्यांची नेहमीच चर्चा होत असते. कधी डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यातील वाद समोर येतो, तर कधी डिलिव्हरी बॉयचा संघर्ष चर्चेत आहे. दरम्यान एका धक्कादायक प्रकारामुळे ब्लिकंइट चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रातील विरारमधील एका अपार्टमेंट इमारतीच्या लिफ्टमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटने धक्कादायक कृत्य केले ज्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले हे कृत्य सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी एजंट लिफ्टमध्ये प्रवेश करतो. तो एकटा असल्याचे पाहून एका कोपऱ्यात सरकतो लघवी करताना दिसत आहे. लिफ्टमध्ये असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

महाराष्ट्रात Blinkit एजंटने लिफ्टमध्ये लघुशंका केली – सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद

ही घटना विरारमधील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे, जिथे डिलिव्हरी एजंटच्या वागण्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी फुटेज पाहिल्यानंतर त्याला जाब विचारला. दरम्यान, दुसऱ्या क्लिपमध्ये रहिवासी त्या डिलिव्हीरी बाॉयबरोबर वाद सुरू असल्याचे दिसते. डिलिव्हरी बॉय त्यांना विचारतो की, “तुम्ही मला का मारत आहात?” तो विचारतो, ज्यावर एक रहिवासी उत्तर देतो, “तुम्ही लिफ्टमध्ये काय करत होता? आम्ही तुमच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करू.” डिलिव्हरी बॉय असे कृत्य न केल्याचे दावा करतो.

ब्लिंकिटचा डिलिव्हरी गणवेश घातलेल्या त्या माणसाला बोलिंगज पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी नेण्यापूर्वी रहिवाशांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांनी परिस्थिती पाहिली आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली, ज्यामध्ये घटना स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी ब्लिंकिटच्या डिलिव्हरी एजंटची चौकशी केली जिथे त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे. हे प्रकरण विरार पश्चिमेकडील सीडी गुरुदेव इमारतीचे आहे. इमारतीच्या लिफ्टमध्ये लघवी केल्याबद्दल विरार पश्चिमेतील बोलिंगे पोलिस स्टेशनमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लिफ्टमध्ये Blinkit डिलिव्हरी बॉयने केली लघुशंका; सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

सध्या तरी, ब्लिंकिटने या प्रकरणावर कोणतेही विधान जारी केलेले नाही

या महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटने त्याच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला आणि त्याला फोनवर धमकी दिली, कथितपणे म्हटले की, “मला माहित आहे की तू कुठे राहतोस.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने पुढे असा आरोप केला की,”त्याच एजंटने काही मिनिटांत १५ हून अधिक फोन कॉल करून त्याला त्रास दिला, अपशब्द आणि धमक्या दिल्या.