Boyfriend Surprise Girlfriend : प्रेम म्हणजे काय — हे शब्दात सांगणं कठीण, पण अनुभवणं अगदी सोपं! कधी एखाद्या छोट्या सरप्राइझमध्ये, कधी एखाद्या साध्या मेसेजमध्ये, तर कधी फक्त हसऱ्या चेहऱ्यात ते दिसतं. आजच्या डिजिटल जगातही प्रेमाचं ते जुनं गोडपण अजून जिवंत आहे — फक्त आता ते कधी रीलमध्ये, कधी फोटोमध्ये, तर कधी एखाद्या अनोख्या व्हायरल व्हिडिओमधून दिसतं. असाच एक मजेशीर आणि हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्रेमात वेडेपणा असतोच, पण त्यात गोडपणाही तितकाच असतो! एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असा भन्नाट बर्थडे सरप्राइझ दिला की सर्वजण थक्क झाले. स्विगीचे युनिफॉर्म घातलेला एक तरुण रात्री उशिरा केक घेऊन आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहचतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचा भाव पाहण्यासारखा असतो. हा मनोरंजक आणि हृदयस्पर्शी क्षण एका मित्राने मोबाइलवर शुट केला आणिसोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या क्रिएटिव्ह सरप्राइझला प्रेमाची नवी परिभाषा म्हटले तर काहींनी त्यावर हसायला आणि भावूक व्हायला सुरुवात केली.

गर्लफ्रेंडसाठी डिलिव्हरी बॉय झाला तरुण

तरुणाने आधीच स्विगी इंस्टामार्टच्या एका डिलिव्हरी एजंटकडून युनिफॉर्म व हेल्मेट भाड्याने किंवा विनंती करून घेतल्याचे क्लिपमध्ये दिसते. त्यामुळे तो एका नॉर्मल डिलिव्हरी बॉयप्रमाणे रात्री गर्लफ्रेंडच्या घराच्या बाहेर उभा राहतो. हातात केक असताना तो शांतपणे थोडा वेळ घराबाहेर थांबतो. जशी तिची गर्लफ्रेंड बाहेर येते, तेव्हा बॉयफ्रेंडला पाहून ती दार ओढून घेते. तिच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यकारक असता. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येतो.

या संपूर्ण प्रसंगाचे रेकॉर्डिंग तरुणाच्या मित्राने केले होते. व्हिडीओ व्हायरल झाला कारण नेटकऱ्यांना तो प्रचंड आवडला. केक एकत्र कापताना दोघांच्या चेहऱ्यावरचे प्रेम, थोडासा संकोच आणि नंतरचा हळूवार संवाद इतके नैसर्गिक दिसतात की पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटते.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहणाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तरुणाचे कौतुक केले आणि लिहिले की “असा बॉयफ्रेंड सर्वांनाच मिळावा,” तर काहींनी विनोद करत म्हटले की “भाऊने इतक्या प्रेमात जाऊन डिलिव्हरी बॉयची नोकरी स्वीकारली — यापेक्षा मोठा सरप्राइझ काय असू शकेल?” काही लोकांनी विचारले की, “जर खरी स्विगी येऊन विचारत असेल तर?” तर काहींच्या कमेंटमध्ये म्हटले की जर ही व्हिडिओ मुलीच्या माता-पित्यांना सापडला तर त्यांचे काय प्रतिक्रिया असतील.

ही छोटी आणि साधी कल्पना इतकी खास वाटत आहे की व्हिडिओ लोकांना भावला; काहींना तो हसणारा वाटला तर काहींना भावूक करणारा वाटला. या प्रकारच्या सरप्राइझच्या व्हिडीओमुळे प्रेमाची वेगवेगळी भाषा समोर येते — महागडा किंवा ग्लॅमरस गिफ्ट न देताही व्यक्त केलेले प्रेम कधी कधी अधिक अर्थपूर्ण आणि खरे असते.