Viral video: फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. यावेळी तरुणाईमध्ये प्रेमाची भरती येते. यावेळी जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते तेव्हा तिला किंवा त्याला प्रपोज कसे करायचे, असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. यासाठी अनेकजण चित्रपटांमध्ये दाखवलेले प्रपोज करतानाचे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात.यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. लोक या आठवड्यात आपलं प्रेम व्यक्त करतात. असाच प्रपोज करतानाचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भर लोकांमध्ये प्रपोज करतो. मात्र गर्लफेंडची त्यावर जी रिअॅक्शन येते ती खूपच भयंकर आहे.

मुलं ही आपल्या आवडत्या मुलीचा होकार मिळवण्यासाठी प्रपोजच्या हटके आयडीया ट्राय करत असतात. स्टेडियमवर प्रपोज करणे यात तसं काही नवं नाही. आपण अनेकदा क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मॅचदरम्यान, स्टेडियमवर प्रेक्षकांमध्ये बसून मित्र किंवा मैत्रिणीला प्रपोज केल्याचं पाहिलं आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एका स्टेडिअमध्ये असतात आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. मात्र गर्लफ्रेंड त्याच्यासोबत धक्कादायक गोष्ट करते. ती त्याला चापट मारते आणि त्याच्या अंगावर हातातील ज्यूसही फेकते.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बॉयफ्रेंड गर्लफेंड स्टेडिअमध्ये आहेत. दोघेही रोमान्स करत असतात. अचानक बॉयफ्रेंड गुडघ्यावर बसतो आणि रिंग काढतो. गर्लफ्रेंडला प्रपोज करणार तोच ती शॉक होते. तरुणीला वाटतं की त्यात हिऱ्याची किंवा सोन्याची अंगठी असेल आणि प्रियकर तिचं स्वप्न भंग करतो. सोन्याच्या किंवा डायमंडच्या अंगठीऐवजी, बॉक्समधून कँडी रिंग बाहेर काढतो. हे पाहून तरुणी त्याला चापट मारते. ती एवढ्यावरच थांबत नाही. ती त्याच्या अंगावर ड्रिंकही फेकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘माझी, माझी’ म्हणत एका तरुणीसाठी मुलांचे दोन गट भिडले; लाथा-बुक्क्या-चेननं केली मारहाण; VIDEO व्हायरल

प्रत्येक मुलीनं आपल्या जोडीदाराबाबत काही स्वप्नं रंगवलेली असतात. त्यापैकी एक म्हणजे तिला भेटणाऱ्या जोडीदारानं तिला रोमँटिक असं प्रपोज करावं. बरं आपल्या आवडत्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी मुलंदेखील काय काय नाही करत. प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीनं प्रपोज करण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून तरुणीकडून होकार आलाच पाहिजे. मात्र या तरुणानं तरुणीच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला असं नेटकरी म्हणत आहेत.