Viral video: दोन दिवसांपूर्वी सर्वत्र होळी साजरी करण्यात आली. दरम्यानचे होळीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात लोक रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर रंग टाकताना आणि असभ्य वर्तन करताना दिसले. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाराणसीतील मणिकर्णिका घाटातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे काही टवाळखोरांनी जोडप्यासबोत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वजण संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वाराणसीच्या घाटावर एक जोडपे उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. जवळपास स्थानिक लोक आहेत. जेव्हा ते जोडपे तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही टवाळ मुलं त्यांच्यावर पाणी टाकतात आणि त्यांच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ @govindprataps12 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आणि तरुणी मणिकर्णिका घाटावर होळीच्या दिवशी आले होते. यावेळी मणिकर्णिका घाटावरुन जाताना तरुणीच्या अंगावर फुगे मारण्यात आले. पाणी फेकण्यात आलं. एकाने समोरुन येत तरुणीच्या अंगावर बाटलीने पाणी ओतलं. तरुणीसोबत असलेल्या तरुणाने टवाळखोरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तरुणाला रोखलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोर निकल के भागा! धावत्या ट्रेनमध्ये चोर महिलेची सोनसाखळी चोरून पसार; प्रवाशांनो “हा” VIDEO एकदा बघाच

हा व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये, दुसरे अडचणीत असताना आपण मदत करण्याऐवजी फक्त बघत बसतो तेव्हा हे लक्षात ठेवा की पुढचा नंबर तुमचा असू शकतो. दरम्यान आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी, अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “भटक्या जमावापासून प्रत्येकाला धोका आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “लज्जास्पद घटना.” त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, होळीचे नाव घेऊन अशा प्रकारे एखाद्याला त्रास देणे अत्यंत चुकीचे आहे.