संपूर्ण जगावर पुन्हा एकदा करोनाच संकट ओढावलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वधूचा आहे ज्यामध्ये पार्लरमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करून वधूचा मेकअप केला जात आहे.
एका पार्लरचे कामगार अंतर ठेवून वधूचा मेकअप करताना दिसत आहेत. वास्तविक, व्हिडिओमध्ये वधू ब्युटी पार्लरमध्ये बसली आहे आणि मेकअप आर्टिस्ट दोन मास्क लावून दुरूनच ब्रशने वधूचा मेकअप करत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती दुरूनच वधूचे केस बांधताना दिसत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत आणि कमेंट्सही करत आहेत.
नेटकरी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, सोशल डिस्टन्सिंगने सर्व मर्यादा ओलांडल्या असं दिसतंय. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, इतक्या लांबून खरंच मेकअप होईल का?.