तमिळनाडूतल्या कुड्डलोर जिल्ह्यात एक लग्नसोहळा सुरू होता. सगळे आनंदात होते, वऱ्हाडी नाचत होते. नवरा-नवरीही खूश होते. मात्र अचानक असं काही घडलं की नवऱ्याने नवरीच्या कानशिलात लगावली. त्याला नवरीनेही जशास तसं उत्तर देत नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला. नक्की घडलं काय या मांडवात? जाणून घ्या…

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नसोहळ्यादरम्यान नवरा आणि नवरी नाचत होते. तेवढ्यात नवऱ्यामुलीचा चुलत भाऊ तिकडे आहे आणि त्या दोघांचा हात धरून तोही नाचू लागला. नाचता नाचता या भावाने नवरा आणि नवरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि नाचू लागला. यामुळे वैतागलेल्या नवऱ्याने नवरीला आणि तिच्या भावाला दूर ढकललं.

नवऱ्या मुलीच्या परिवाराने सांगितलं की नवऱ्या मुलाने सर्वांसमक्ष नवरीच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर नवरीने तात्काळ मांडवातच लग्न मोडलं आणि तिच्या घरातल्यांनीही तिच्या या निर्णयाला संमती दिली. यानंतर लगेचच नवरीला तिच्या नात्यातल्या दुसरा नवराही मिळाला. त्या दोघांनी ठरलेल्या मुहुर्तावर लग्न केलं मात्र लग्नाचं स्थळ वेगळं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० जानेवारीला या जोडीचं लग्न होणार होतं. त्यांच्या समाजातल्या परंपरेनुसार आदल्या दिवशी म्हणजे १९ जानेवारीला रिसेप्शन होतं. या प्रकाराबद्दल नवऱ्या मुलाने पनरुती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून लग्नाचा सर्व खर्च परत मागितला आहे.