Bride dance video: लग्नात डान्स नसेल तर कसं चालेल? त्यात नवरा-नवरी थिरकले नाही तर…सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवरीने असा काही डान्स केला आहे की तो पाहिल्यानंतर नवरदेवही लाजून लाल झालाय. भारतातील लग्न म्हटलं की डान्स शिवाय अपूर्ण आहे. मग ती मिरवणूक असो किंवा क वधू-वर, लोकं जोरदार नाचतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे समजते की, आता ते दिवस राहिले नाही, जेव्हा वधू तिच्या लग्नाच्या दिवशी खिडक्यांमधून लग्नाच्या मिरवणुका पाहत असायची. पण, आता केवळ वराचे मित्रच नव्हे तर वधूच्या मैत्रिणी लग्नात मनसोक्त नाचतात. वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका नवरीचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. लग्नात नवरीनं आपल्या नवऱ्यासाठी तुफान डान्स केला आहे.

नवरीने “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे.यावेळी नवरीचा डान्स पाहून नवरदेवही खूश होऊन लाजताना दिसतोय. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहे तर नवरदेवही लाजताना दिसत आहे. यावेळी नवरीच्या बहिणींनी नवरदेवाला नाचण्यासाठी बोलावलं असतानाही नवरदेव लाजताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ nanditashisatkar_01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलं आहे की, “वाह वाह हौशी नवरी”, तर आणखी एकानं, “प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.