Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाच्या मित्रांमुळे चक्क भर लग्नात नवरी पडली आहे. एवढंच नाहीतर एवढं होऊनही मदत सोडा नवरदेवानं मात्र ढुंकूनही तिच्याकडे पाहिलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक व्हिडीओ पाहून टीका करत आहेत.
सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.


लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मणीय क्षण असतो. परंतु हाच क्षण एका नवरीसाठी खुपच अपमानास्पद ठरला. भर लग्नात सर्व पाहुण्यांसमोर नवरदेवाच्या मित्रांमुळे नवरी स्टेजवरुन पडली. मात्र नवरदेव यावेळी जागेवरुन हललाही नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी स्टेजवर बसले आहेत. यावेळी नवरदेवाचे मित्र त्यांच्या मागून येतात आणि त्यांचा नवरीला धक्का लागतो. यावर नवरी बसलेल्या खुर्चीसोबतच मागे पडते. यावेळी नवरदेवानं मदत करणं अपेक्षित आहे मात्र त्यानं साधं तिकडे पाहिलंही नाही. असं नक्की काय झालं? कसं झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुम्हीही पाहा हा व्हिडीओ.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतक्रिया देत आहेत. “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे असा नवरा मिळाला तर बापरे..” अशी प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. तर आणखी एकानं,  एकानं म्हंटलंय बापरे “लग्नामध्ये नवऱ्याचं खरं रुप समोर आलं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.