Bride runs away from the wedding लग्नाचं घर म्हटलं की, चार-दोन महिने आधीच लगबग सुरू होते. लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसं नवरी-नवरदेव यांची लग्नसमारंभाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते. प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं… नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत नवरी पळून गेल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. सध्या अशीच एक घटना आता समोर आली आहे.

लग्नाचा दिवस उजाडला, मंडप सजला नवरा मुलगा, त्याचं कुटुंब आणि नातेवाईक वाजतगाजत लग्न मंडपात आले. नवरा मुलागा आणि नवरी मुलगी स्टेजवर आली खरी पण क्षणात ती तिथून पळत हॉलच्या बाहेर जाऊ लागली.या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी अचानक लग्न समारंभातून बाहेर पडते आणि बाहेर कारमध्ये थांबलेल्या व्यक्तीसोबत पळून जाते. यावेळी नवरा मुलगाही नवरीच्या मागे धावताना दिसत आहे. मात्र नवरी आपल्या बॉयफ्रेंडच्या गाडीत बसते आणि पळून जाते. यावेळी नवरा मुलगा आपल्या पायतला बूट गाडीच्या मागे फेकून मारतो आणि डोक्याला हात लावून बसतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आधी देवाला नमस्कार केला, आशीर्वाद घेतला अन्… बाजूच्या घरावर फेकले बॉम्ब; पण एक चूक पडली महागात

ninamariedaniele नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ४४.७ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला सुमारे २ दशलक्ष वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…माझा विश्वास बसत नाही. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…सिंड्रेला स्नीकर्स घालून पळत आहे, हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले… अरे देवा, या जगाचे काय होईल.

लग्नमंडपाला लागली आग

दरम्यान काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका घटनेत लग्नाच्याआधी मंडपाला भीषण आग लागली. मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरमधली ही घटना असून नवरा आणि नवरी लग्न मंडपात दाखल झाले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. आगीची ठिणगी लग्न मंडपात पडली आणि संपूर्ण मंडपाला आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेने मंडपात एकच खळबळ उडाली. लग्नासाठी आलेली लोकं सैरवैर पळू लागली. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानाने अथक प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.