Jabalpur, Madhya Pradesh crime video: गेल्या काही वर्षांपासून देशात गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे कमी होत असले तरी चेन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मात्र लक्षणीय वाढ होत आहे. दरम्यान अशीच एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. यामध्ये एका गुंडानं व्यावसायिकाच्या घरावर बॉम्ब हल्ला आणि गोळीबार केला आहे. दरम्यान या आरोपी याआधी त्याठिकाणी काय केलंय हे पाहून तुम्हीही चक्रावून जालं. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की हा आरोपी अजब आहे.

मंगळवारी जबलपूरच्या घमापूर भागातील भारत कृषी समाज शाळेजवळ ही घटना घडली, जिथे आनंद ठाकूर नावाच्या व्यक्तीने घरावर बॉम्ब फेकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आनंद ठाकूर असं आरोपीचं नाव असून परिसरात दहशत पसरवण्यासाठी त्याने हे केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे बॉम्ब फेकण्याआधी आरोपीने जवळच्या मंदिराला नस्कार केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आरोपी घराबाहेर येतो यावेळी घराशेजारी असलेल्या मंदीराबाहेर हात जोडून पाया पडतो. मंदिराला गोल गोल प्रदक्षिणा घालतो. आणि मग बाजूच्या घरावर दोन बॉम्ब फेकतो आणि गोळीबार करत तिथून फरार होतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ब्रेकऐवजी चुकून दाबला एक्सीलेटर अन्…नवीन कार येण्याच्या २ तास आधीच विपरीत घडलं; तमिळनाडूतला थरारक VIDEO

ही घटना कैद करणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दोन्ही हातात बॉम्ब घेऊन चालताना दिसत आहे आणि निवासस्थानी पोहोचल्यावर तो एकामागून एक बॉम्ब फेकत आहे. आरोपी एका बॉम्बचा स्फोट करण्यात अयशस्वी झाला, तर दुसरा स्फोट झाला नाही. परिसरातील दुकानदार आणि सामान्य लोकांकडून तो गुंडा टॅक्स वसूल करतो. खंडणी दिली नाही तर त्यांना धमकावणं आणि मारहाण करणं असे प्रकारही त्याच्याकडे केले जातात. आता दिवसाढवळ्या बॉम्ब हल्ला केल्याने परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर या परिसरात रहिवाशांनाच नव्हे तर व्यावसायिकांनाही धमकावणे यासाठी कुप्रसिद्ध आहे. रहिवाशांनी घमापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून ठाकूरचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. CCTV फुटेजच्या आधारावर तो चोर लवकरच पकडला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती ज्यामध्ये एक व्यक्ती मंदिरात जातो आणि चारही बाजूंना बघतो. यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि मग मंदिरातील मूर्ती घेऊन तिथून फरार होतो.