डिजनी (Disney) हे नाव अगदी प्रत्येक लहान मुलाच्या ओळखीचे आहे. मिकी माऊस, बार्बी, ट्वीटी आदी अनेक कार्टूनने सजवलेलं डिजनीचं हे थीम पार्क हाँगकाँगमधील डिजनीलँड जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळाला अनेक पर्यटक भेट देतात. तर सध्या सोशल मीडियावर चिमुकलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकली तेलंगणाच्या मंत्र्यांकडे अनोखी मागणी करताना दिसून आली आहे, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल.

@visurendra यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरेंद्र विनायकम असे या युजरचे नाव असून त्यांची लेक एक अनोखी मागणी करताना दिसते आहे. चिमुकलीने ही मागणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव यांच्याकडे केली आहे. चिमुकलीने डिजनीलँड हैदराबादला आणण्याचा विचार करण्याची विनंती मंत्र्याकडे केली आहे. तेलंगणाच्या मंत्र्यांकडे चिमुकलीने कोणती मागणी केली, एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…“आई मला अभ्यास नको फक्त खायला हवं” अभ्यास करुन कंटाळलेल्या चिमुकल्याचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक चिमुकली व्हिडीओत एक अनोखी मागणी करताना दिसते आहे. ‘हॅलो केटीआर मामा!’ प्लीज, डिजनीलँडला हैदराबादला आणण्याचा विचार करा’, असे बोलताना दिसत आहे. हा एक्स (ट्विटर) वरील व्हायरल व्हिडीओ पाहून तेलंगणाच्या मंत्र्यानेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बेटा वचन देऊ शकत नाही, पण मी प्रयत्न करेन’; असे कॅप्शन लिहून त्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट १५ नोव्हेंबरला @visurendra यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली. तर @KTRBRS यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून काल ही रिपोस्ट करण्यात आली आहे. तसेच ‘तेलंगणा निवडणुकीबाबत माझ्या मुलीची केटीआरला अनोखी विनंती’, असे कॅप्शन युजरने या व्हिडीओला दिले आहे. चिमुकलीच्या या खास मागणीने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.