भाऊ-बहिणीचं नातं खूप वेगळं असतं. बहीण भावाचं नात असतंच असं, ज्यामध्ये भांडण-प्रेम सर्व गोष्टींचा सामावेश असतो, त्यामध्ये जेवढे भांडण तेवढंच प्रेम सुद्धा समाविष्ट आहे. एकमेकांना जीव लावणे, एकमेकांच्या चुका आणि सर्व गोष्टींना समजून घेणे, मदत करणे या प्रेमळ नात्याला कोणतीच उपमा दिली जाऊ शकत नाही. अशा चिमुकल्या भाऊ-बहिणींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा चिमुकला त्याचाच हातात फुलांचा गुच्छा घेऊन येतो. हा फुलांचा गुच्छा घेऊन तो त्याच्या बहिणींकडे जातो. त्याच्या तिघी बहिणी एका रांगेत बसलेल्या दिसून येत आहेत. चिमुकला भाऊ एक एक करत तिघी बहिणींना तो फुलांचा गुच्छा देतो. भावाने फुलांचा गुच्छा दिल्यानंतर तिघी बहिणी त्याला एक गोड मिठी मारताना दिसत आहेत. हा चिमुकला भाऊ सुद्धा बहिणींना प्रेमाची मिठी मारतो. या व्हिडीओमधल्या तिघी गोंडस बहिणींनी एकसारखेच कपडे परिधान केलेले दिसून येत आहेत. या तीन बहिणी अतिशय गोंडस दिसून येत होत्या.

आणखी वाचा : रस्त्यावरची ट्रॅफिक पाहून हत्तीचा राग अनावर, त्यानंतर जे घडलं ते या VIRAL VIDEO मध्ये पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात दिवंगत वडिलांचा जिवंत भासणारा पुतळा पाहून नवरीला अश्रू अनावर, सारेच जण भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा गोंडस व्हिडीओ vivienneandfrancesca नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या गोंडस भावंडांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आपल्या भांवंडांसोबतच्या लहानरणीच्या आठवणी ताज्या करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ७.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ लाख ६१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या गोंडस भावंडांमधील प्रेमाचं कौतुक करत आहेत.