Heart Touching Animal Rescue Video: मैत्री म्हणजे काय असते, हे सांगायला शब्द पुरत नाहीत आणि आज माणसांपेक्षाही कधी कधी प्राण्यांचं नातं अधिक खरं आणि नि:स्वार्थी वाटतं. याचा अगदी हृदयस्पर्शी अनुभव एका व्हायरल VIDEO मध्ये दिसून आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
जगात सगळ्यात पवित्र नातं कोणतं असेल तर ते म्हणजे मैत्री आणि या मैत्रीचं खरं स्वरूप शब्दांनी नाही, कृतीनंच दाखवलं जातं. आज जिथं माणसाच्या नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, तिथं प्राणी मात्र नातं निभावण्यात मागे नाहीत. एका पुराच्या भरात वाहणाऱ्या नदीत एक म्हैस मृत्यूच्या काठावर पोहोचली होती. तिच्या अवतीभवती कोणीही नव्हतं. पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं… आशा संपली होती… पण तेवढ्यात अचानक तिची एक मैत्रीण धावत आली आणि तिनं भयंकर प्रवाहात स्वतःचीही पर्वा न करता, त्या पाण्यात उडी घेतली आणि एक अशक्य वाटणारा थरार सुरू होतो.
या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक म्हैस प्रचंड वेगानं वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात अडकलेली आहे. ती जीव वाचवण्यासाठी धडपडत असतानाच अचानक दुसरी म्हैस धावत तिथे येते. ती कोणताही विचार न करता, अगदी आपला जीव धोक्यात घालून, पाण्यात उडी घेते आणि अडकलेल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचते. तिच्या सोबतीने, आधाराने व चिकाटीने अखेर ती म्हैस तिला बाहेर काढण्यात यशस्वी होते.
व्हिडीओसोबत शेअर करण्यात आलेल्या एका कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मैत्रीण वाहतेय; पण एक मूक प्राणी तिला सोडून जात नाही. ती स्वतःचीही पर्वा न करता पाण्यात उतरते, धीर देते आणि अखेर वाचवूनच दम घेते.”
हा व्हिडीओ पाहून हजारो युजर्स भावूक झाले आहेत. “जिथे कोणीही मदतीला येत नाही, तिथे एक म्हैस दुसऱ्या म्हशीसाठी आपला जीव पणाला लावते”, असं एक युजर म्हणतो. तर दुसरा म्हणतो, “प्राणी कधी कधी माणसांहूनही चांगली मैत्री निभावतात.”
येथे पाहा व्हिडीओ
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, मैत्री खरी असेल तर संकटं कितीही मोठी असली तरी त्यातून सोबत बाहेर पडता येतं. हा VIDEO म्हणजे नुसतं एक दृश्य नसून, मैत्रीचं शुद्ध आणि नि:स्वार्थी रूप आहे, जो प्रत्येकानं पाहायला हवा… आणि एकदा तरी असा विचार करायला हवा की, आपणही कोणाच्या मदतीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अशी धाव घेतो का?