Viral video: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करीत आहेत. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुले एकेकटी जात असली की, हे कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे अंगावर धावून येत हल्ला करतात. त्यामुळे आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढविण्याचे हे प्रमाण खूपच वाढत आहे. अशातच आता चक्क कुत्र्यांना घाबरून बैल थेट घराच्या छतावर चढला आहे.

खरं तर बैल हा अत्यंत खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. एकदा का त्याला राग आला, की भल्याभल्यांना शिंगावर घ्यायला मागेपुढे पाहात नाही. पण इतक्या शक्तिशाली प्राण्याला चक्क गल्लीतल्या कुत्र्यांनी घाबरवलं. आणि या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तो चक्क घराच्या छपरावर जाऊन उभा राहिला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसावं की रडावं कळणार नाही.

ही घटना तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यातील निराल गावात घडली आहे. तर घडलं असं की गावातील भटक्या कुत्र्यांच्या एका टोळीनं बैलावर हल्ला केला. सुरूवातीला बैलानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण चहुबाजूंनी हल्ला होताच तो गोंधळला. परिणामी, कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तो मार्ग दिसेल तिथे पळत सुटला. बरं, कुत्र्यांनी सुद्धा त्याचा पाठलाग काही सोडला नाही. त्यामुळे मग दगडांचा आधार घेत तो थेट घराच्या छपरावर चढला.

तुमचाही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो एका घराच्या वर सावधपणे उभा आहे. त्याला धड तिथून हलताही येईना आणी खालीही उतरता येईना अशी त्याची परिस्थिती झाली आहे.

पाहा व्हिडीओ

टक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Khabarfast नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.