Viral Video : सध्या लग्न समारंभ जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्स, अनोख्या प्रथा, गाणी, नवरदेव नवरीचे भन्नाट किस्से व्हायरल होतात. लग्न हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर व अविस्मरणीय दिवस असतो पण अनेकदा एका चुकीमुळे लग्नाचा हा खास दिवस खराब सुद्धा होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाचा मंडप पेटताना दिसत आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

लग्नामध्ये फटाके फोडताना काळजी घ्या! एका चुकीने लग्नाचा मंडप खाक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नाचा मंडपाल आग लागलेली दिसत आहे आणि लोक सैरावैरा पळताना दिसत आहे. काही लोक मंडप पाडताना दिसत आहे तर काही लोक पाण्याने आग विझवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “लग्नामध्ये फटाके उडवताना थोडी काळजी घ्या. लहान मुलांच्या हातात देऊ नका.”
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील आहे. लग्नामध्ये फटाके फोडताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे लग्नात जर फटाके फोडत असाल तर काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही वाईट वाटेल किंवा अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

ram_phalke77 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सावरगाव तालुका मुखेड ..काल ची घटना आहे…लग्नामध्ये फटाके उडवताना थोडी काळजी घ्यावी.. लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नयेत..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप वाईट झाले राव” तर एका युजरने लिहिलेय, ” लग्नाच्या वेळी फटाके फोडलेच पाहिजे का” तर एका युजरने लिहिलेय, “लोक लोक बघत उभे आहेत. मदत करत नाही” काही युजर्सनी दु:ख व्यक्त करणारे इमोजी शेअर केले आहेत.