Brain Teaser Viral Puzzle: तुम्हाला कोडी आवडतात? खरं तर हा प्रश्न विचारण्यातच अर्थ नाही. कुणाला आवडत नाहीत कोडी? सगळ्यांना आवडतात. सोशल मीडियावर असे अनेक कोडी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असे कोडे प्रचंड व्हायरल होत आहे, जे पाहिल्यावरच लोकांचा मेंदू फिरतोय. या कोड्याचं उत्तर शोधताना लोक अक्षरशः गोंधळून जात आहेत. प्रश्न ऐकून तुम्हालाही सुरुवातीला वाटेल की हे तर अगदी सोपं आहे, पण खरं उत्तर ऐकून तुमचाही मेंदू सैरभैर होईल. कोड नेमकं काय आहे जाणून घ्या…
कोडं आहे, “एका घरात तीन लोकं राहतात; एक लंगडा, एक आंधळा आणि एक बहिरा; सांगा, या तिघांपैकी चक्कीवर ५० किलो पीठ दळायला कोण जाईल?” प्रश्न ऐकून सुरुवातीला लोक विचार करतात: लंगडा जाऊ शकणार नाही कारण चालता येत नाही, आंधळा चालू शकतो पण वाट कशी शोधणार? बहिरा जाऊ शकतो, पण चक्कीवाल्याशी संवाद कसा साधणार?
या तीनही व्यक्तींच्या मर्यादा लक्षात घेतल्यावर अनेक जण उत्तर देताना चुकतात. कोणी म्हणतो बहिरा जाईल, कारण ऐकण्याशिवाय बाकी सगळं करतो. कोणी म्हणतो आंधळा जाईल, कारण लंगड्याला तर चालताही येत नाही. काही जण म्हणतात, लंगडाच जाईल कारण लंगडत चालू शकतो.
येथे पाहा व्हिडीओ
मात्र, उत्तर कुणालाच थेट सापडत नाही… कारण यामागे आहे एक शब्दांचा खेळ! काय उत्तर येईल बरं?
खरं तर हे कोडं खूपच सोपं आहे… पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अजूनही अनेकांना याचं उत्तर देता आलेलं नाही. हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न सुरू करा. बरं आम्हीच तुम्हाला उत्तर देत आहोत. याचं योग्य उत्तर आहे, “कोणीही चक्कीवर जाणार नाही”, कारण कोडं बारकाईने लक्षात घेतल्यास, विचारले आहे की “चक्कीवर ५० किलो पीठ दळायला कोण जाईल?” आता थोडा विचार करा, पीठ तर आधीच दळलेलं असतं, मग चक्कीवर दळायला न्यायचं कशाला? म्हणजे, कोड्यातच शब्दांचा असा क्लू आहे की जो अनेकांच्या लक्षात येत नाही.
हीच मजा आहे अशा कोड्यांची, जी ऐकायला सोपी वाटतात पण उत्तर देताना डोक जोरात चालवायला लावतात. ही कोडी इतकी मजेशीर असतात की ती वाचणाऱ्यांना विचार करायला भाग पाडतात, म्हणूनच ही कोडी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आहेत.