scorecardresearch

कॅप्टन जॅक स्पॅरो रस्त्यावर मागतोय भीक? ‘या’ अभिनेत्याचा अभिनय पाहून नेटकरीही गोंधळले; पाहा Viral Video

दोन महिन्यांपूर्वी हा व्हिडीओ समोर आला होता, परंतु पुन्हा एकदा तो ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Captain Jack Sparrow begging on the street
पैसे गोळा केल्यावर तो जॅक स्पॅरोसारखा हसतो आणि निघून जातो. (Photo : Twitter/ @javroar)

कॅप्टन जॅक स्पॅरोच्या वेशातील भिकाऱ्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की तो माणूस पैसे मागताना जॉनी डेपच्या (ज्याने ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ फ्रँचायझीमध्ये भूमिका साकारली होती) वागण्या-बोलण्याचं पूर्णपणे अनुकरण करतो आणि लूक पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्याकडे एक टॉय गन देखील ठेवली आहे. दोन महिन्यांपूर्वी हा व्हिडीओ समोर आला होता, जेव्हा मिस्टर डेप त्याची माजी पत्नी अंबर हर्ड विरुद्ध कायदेशीर लढाई लढत होते, परंतु पुन्हा एकदा ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसतंय की एक व्यक्ती आपल्या कारमध्ये बसून त्या माणसाचा व्हिडीओ शूट करत आहे. त्यावेळी कॅप्टन जॅक स्पॅरोच्या वेशातील हा माणूस त्याच्या कार जवळ येतो. तो आपली टॉय गन काढतो आणि कारकडे रोखतो. यानंतर तो कारच्या खिडकीजवळ जाऊन पैसे घेण्यासाठी आपली टोपी पुढे करतो. पैसे गोळा केल्यावर तो जॅक स्पॅरोसारखा हसतो आणि निघून जातो. हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला हे कळू शकलेले नाही.

लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

@javroar या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून ‘मी आतापर्यंत पाहिलेला भीक मागण्याचा हा सर्वात क्रिएटिव्ह मार्ग आहे.’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका ट्विटर युजरने म्हटले, ‘या प्रयत्नासाठी मी याला १०० डॉलर देईन.’ हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास आठ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि साडे तीन लाखांहून अधिक युजरनी त्याला लाइक केले आहे.

काम करावं तर असं! मुंबईच्या मुसळधार पावसातून ऑर्डर पोहचवण्यासाठी Swiggy डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरून प्रवास

मिस्टर डेप यांनी अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टमधील २०१८ च्या लेखासाठी अंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला जिंकला. यावेळी अंबर हर्डला मिस्टर डेप यांना १०.३५ दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Captain jack sparrow begging on the street netizens were also confused by the actor performance watch viral video pvp

ताज्या बातम्या