दिवसेंदिवस अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत चालल्याचं पाहून रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या आणि पायी चालणाऱ्या सर्वांनाच सतर्क राहण्याचं, हेल्मेट घालण्याचं, सीटबेल्ट लावण्याचं आवाहन केलं जातं. जेणेकरुन अपघात झाला तरी जास्त इजा होणार नाही. तरीही अनेक लोक या नियमांचं पालन करत नाहीत आणि अपघातात गंभीर जखमी होतात. अशीच एक भीषण अपघाताची घटना सध्या समोर आली आहे जी पाहून तुम्हालाही जाणवेल की सीटबेल्ट लावणं किती गरजेचं असतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वेगाने निघालेली कार ट्रकखाली घुसली आहे. संपूर्ण कारचा चेंदामेंदा झाला आहे. हा अपघात पाहणाऱ्यांना घाम फुटला आहे. ज्या लोकांनी त्या कारचा दरवाजा घाबरत घाबरत उघडला आहे. त्यावेळी अपघाच झालेल्या त्या कारचा चालक व्यवस्थित बाहेर येतो. हे पाहून तिथं अपघात पाहणाऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्या व्यक्तीला काहीचं झालेलं नाही. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांनी हे फक्त सीटबेल्ट आणि एअरबॅगमुळे शक्य झालं आहे असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – video: किळसवाणा प्रकार! चॉकलेटमध्ये सापडली जिवंत अळी, तुमच्यासोबतही घडू शकतं असं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ट्विटरवरती आईपीएस अधिकारी स्वाति लाकरा (@SwatiLakra_IPS) यांनी शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट शेअर करीत असताना कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, सीट बेल्ट आणि एयरबॅगचं का महत्वाची आहे. हे सांगितलं आहे.