विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच असून हिंगणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरात मायलेकी वाहून गेल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत तोच मंगळवारी सावनेर तालुक्यात वाहनासह सात जण वाहून गेले. त्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतल्याचं पहायला मिळालं. मात्र एकीकडे पाऊस आणि पूराच्या पाण्यानं थैमान घालतं असतानाच दुसरीकडे अशा पावसामध्येही नसतं धाडस करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.

शैलेश वर्मा नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका नदीवरील पुलावरुन पुराचं पाणी वाहत असल्याचं दृश्य या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं. नदीपात्र कशाप्रकारे दुथडी भरुन वाहत आहे हे नदीच्या काठावरुन पूल सुरु होतो तिथं उभं राहून दाखवण्याचा प्रयत्न व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती करते. हा व्हिडीओ सुरु असतानाच या व्यक्तीच्या बाजूने एक जीप पुराचं पाणी वाहत असणाऱ्या पूलावरुन जाण्याचा प्रयत्न करते. अत्यंत वेगाने ही जीप या पुरावर प्रवेश करते. मात्र गाडीची अर्ध्याहून अधिक चाकं बुडतील एवढं पाणी या पुलावर असल्याने गाडी पुलाच्या मध्यावर गेल्यानंतर वाहून जाते.

गाडी डोळ्यासमोर वाहून गेल्याचं पाहणाऱ्या लोकांचा आरडाओरड आणि महिलांच्या किंकाळ्या या व्हिडीओमध्ये ऐकू येतात. नदीच्या पलीकडील काठावर असलेल्या गाड्यांमधील काही प्रवाशी खाली उतरुन नदी काठावर येऊन पाण्यात पडलेली ही गाडी पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “असा मूर्खपणा का करीत असतील लोक?”, असा प्रश्न विचारण्यात आलाय. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, कोणी काढलाय, कुठे काढला आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी (१२ जुलै रोजी) रात्री शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला १२ तासांच्या आत पाच हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पवासाळ्यामध्ये अशाप्रकारचं नसतं धाडस जीवावर बेतू शकतं.