पाळीव प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमींसाठी तर हे व्हिडीओ पाहणे म्हणजे दिवसभरातील सगळा ताण घालवण्याचा उपाय. अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी असतात, त्यांच्यावर त्या घरातील व्यक्ती जितकं प्रेम करतात, तितकच प्रेम हे पाळीव प्राणी देखील त्यांच्यावर करतात. त्यांच्या गोंडस कृतींचे, हावभावांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधल्या मांजरीला पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘कॅट्स ऑफ इन्स्टाग्राम’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मांजर आरशामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहून बुचकळ्यात पडलेली दिसत आहे. समोर कोणतीतरी दुसरी मांजर आहे का? असा प्रश्न तिला पडल्याचे दिसत आहे. समोर दिसणारी मांजर खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी ही मांजर हाताने आरशावर मारू लागते, मांजरीचे हे रूप पाहून तुम्हालाही हसू येईल. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
आणखी वाचा : हरणाच्या पाठीवर बसून फिरणाऱ्या माकडाचा व्हिडीओ आयएफएस अधिकाऱ्यांनी केला शेअर; म्हणाले “याचे श्रेय आयआयटीला…”
व्हायरल व्हिडीओ :
या मांजरीचे गोंडस हावभाव नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. या व्हिडीओळा आत्तापर्यंत २ लाख ८० हजारांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. प्राण्यांनादेखील नव्या गोष्टींचे कुतूहल असते हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट होत आहे.