Viral Video : कुत्रा आणि मांजर हे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. कुत्रा आणि मांजरीचे जरी पटत नसले तरी अनेकदा तुम्ही एकाच घरात कुत्रा आणि मांजरीला एकत्र प्रेमाने राहताना पाहिले असेल. सोशल मीडियावर कुत्रा मांजरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसेल की मांजर किती हुशारीने कुत्र्यापासून स्वत:ला वाचवते आणि पळ काढते. कुत्रा आणि मांजरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजर आठवू शकते.
कुत्रा आणि मांजर असंख्य  लोकं पाळतात. माणसाच्या अतिशय जवळचे हे पाळीव प्राणी आहेत पण या दोघांचे कधीही पटत नाही. नैसर्गिक अन्नचक्रानुसार कुत्रा मांजरीला खातो त्यामुळे मांजर नेहमी त्याच्या पासून पळत असते.

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. मांजरीच्या मागे कुत्रा लागतो तेव्हा मांजर जीव वाचवण्यासाठी खिडकीवर चढते. कुत्रा खाली उभा राहून बघत असतो. खिडकीची काच बंद असते त्यामुळे मांजरीला बाहेर पडता येत नाही तेव्हा हळूच खिडकीचे दार उघडते आणि खिडकीतून बाहेर पडते. कुत्रा मात्र हे पाहतच राहतो. त्याला काहीही सुचत नाही. हा मजेशीर व्हिडीओ पाहून कुणालाही वाटेल की कुत्र्यापेक्षा मांजर दहा पटीने हुशार आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही. कुत्रा मांजरीचे हे अनोखे नाते तुम्ही अनेकदा चित्रपटात पाहिले असेल पण आता प्रत्यक्षात पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची एकच गर्जना अन् येईल अंगावर काटा, विद्यार्थ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

shouldhaveacat या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पळून जाण्यात ही मांजर खूप पारंगत आहे.”मला ही मांजर खूप आवडली. मला या मांजरीला विकत घ्यायचे आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “चोर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader