Viral Video : चोरीचे अनेक प्रकरणे तुम्ही वाचली किंवा ऐकली असेल पण तुम्ही कधी चड्डी टोळी विषयी ऐकले आहे का? हो, चड्डी टोळी म्हणजे काही चोरांची टोळी ही चड्डी घालून चोरी करतात. त्यांचा हा ड्रेस कोड असतो त्यामुळेच त्यांना चड्डी टोळी म्हणून ओळखले जाते. नुकताच एक चोरीचा घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चड्डी टोळीने हैद्राबादच्या मियापूर येथील शाळेत जवळपास ८ लाख रूपयांची चोरी केली. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा चोरीचा व्हिडीओ शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन चड्डी घातलेले चोर शाळेत चोरी करायला आले आहे. त्यांनी काळ्या मास्कनी चेहरा पूर्णपणे लपवला आहे आणि ते पैसे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. चोरीचे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण चोरांचा असा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हे सीसीटीव्ही कॅमेराचे फूटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

CoreenaSuares2 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हैद्राबाद येथील मियापूर येथे चड्डी टोळीने चोरी केली. दोन चोरट्यांनी शनिवारी वर्ल्ड वन स्कूलमध्ये सात लाख ८५ हजार रुपयांची रोकड लुटली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. यासंदर्भआत शाळेच्या मॅनेटमेंटनी मियापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरांच्या ड्रेसिंगविषयी माझ्याकडे शब्द नाही.”

हेही वाचा : “आमच्या पंढरपूरच्या बायका फारच डेंजर..”, महिलांचे उखाणे ऐकून लोक हसून लोटपोट झाले, म्हणतात, “थांबा सासूला..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी चोरट्यांना रोख रकमेविषयी आधीच माहिती असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी चोरांच्या ड्रेस कोडवर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी व्हिडीओ पाहून मजेशीर जोक्स शेअर केले आहे.
एका युजरने लिहिलेय, “हे चड्डी टोळीचे चोर आहेत असे मला वाटत नाही. पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा ड्रेस कोड निवडला आहे. त्यांनी बोटांच्या खूणा सापडू नये म्हणून हातात ग्लोव्स घातले आहे. त्यामुळे हे स्पष्टपणे कळते की हे दोन्ही चोर शाळेतीलच आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “त्यांन शरीराला तेल लावले आहे जेणेकरून त्यांना कोणी पकडले तर सहज कोणाच्याही हातात येणार नाही. आणखी एका युजरने लिहिलेय, “जशी शाळा पालकांना लुटते तशी चोरांनीही शाळा लुटली.”