Chandra Grahan 2025 Effects On Rashi: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार (आज) ७ सप्टेंबर २०२५ चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात लागणार असून हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५८ मिनिटांपासून मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण लाल रंगाचे असेल ज्यामुळे त्याला ‘ब्लड मून’ देखील म्हटले जाईल. शिवाय या दिवशी पितृ पक्षाची सुरूवात आणि भाद्रपद पौर्णिमादेखील आहे. हे तीन अद्भूत संयोग जवळपास अनेक वर्षांनंतर निर्माण झाले आहेत.

या काळात चंद्रावर सूर्य, बुध आणि केतूची दृष्टी देखील असेल तसेच चंद्र शततारका नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. त्यामुळे या ग्रहणाचा प्रभाव जग, देशासह मेष ते मीन राशींच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल.

१२ राशींवर चंद्रग्रहणाचा प्रभाव

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहण सामान्य असेल. तुमच्या नोकरी, व्यवसायातील तणाव कमी होईल. सुखसंपत्तीत वाढ होईल. अध्यात्मात रस निर्माण होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचा फारसा चांगला प्रभाव पडणार नाही. नोकरीत अधिकाऱ्यांच्या रागाचा सामना करावा लागेल. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी लागेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचा काळ खूप लाभदायी असेल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी सिद्ध चालून येईल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाचा काळ खूप अडचणीनीं भरलेला असेल. या काळात जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची दाट शक्यता आहे.
मानसिक तणावही वाढ शकतो.

सिंह

सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण भाग्यकारक ठरेल. पैशांमुळे अडकलेली कामे ग्रहणाच्या प्रभावाने पूर्ण होईल. तुमच्या स्वभावात समजूतदारपणा वाढेल. बँक बॅलन्समध्ये वाढ होईल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींवर चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल. अडकलेले पैसा परत मिळतील. नवीन कार्यात यश मिळले. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण चांगले फळ देणार नाही. त्यामुळे या काळात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. ग्रहणाच्या दोन-तीन दिवसानंतर नव्या कामाची सुरूवात करा. या काळात आर्थिक व्यवहार सांभाळून करा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाचा काळ सामान्य ठरेल. या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. धनहानी, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. या काळात दूरचा प्रवास टाळा.

धनु

धनु राशीसाठी हे ग्रहण खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून विचार करत असलेल्या गोष्टी सहज पूर्ण कराल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण हानिकारक ठरेल. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक समस्या वाढतील. भावंडांबरोबर वाद होतील. नवीन नोकरी शोधाण्यात अडचणी निर्माण होतील.

कुंभ

कुंभ राशीतीच चंद्रग्रहण लागत असल्यामुळे हे ग्रहण या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार नाही. या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य आणि आर्थिक धोका निर्माण होईल. कामात अडथळे निर्माण होतील.

गुगल ट्रेंड्स

मीन

मीन राशीच्या व्यक्तींवर चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव पडेल. या काळात तुमच्या पगारात वाढ होईल. करिअर, नोकरीमध्ये मनासारखे यश मिळवाल. अनोळखी व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)