Chandrayaan 3 Landing: चंद्रयान ३ चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान ३ यशस्वीरीत्या चंद्रावर उतरावं यासाठी देशात ठिकठिकाणी होमहवन, नमाज पठण केलं जात आहे. भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण करणारा भारत चौथा देश असणार आहे.

पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाआरती आणि होमहवन करून गणरायाकडे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तर हरिद्वार, कडोदरा, सूरत, वाराणसी, तामिळनाडू याठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे हवन आयोजित करण्यात आले होते. तर अजमेर शरीफ दर्गा, राजस्थान येथे चंद्रयानासाठी नमाज पठण करण्यात आले.

Video: देशभरात चंद्रयानासाठी नमाज व पूजा

पुणे: चंद्रयान महाआरती

उज्जैन महाकालेश्वर मंदिरात ‘भस्म आरती’

https://x.com/ani_mp_cg_rj/status/1694150590312624458?s=46

हे ही वाचा << Chandrayaan-3 Landing Live Streaming: चांद्रयान ३ चंद्रावर उतरताना कधी व कुठे पाहाल? वेळ जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेत १४ जुलै २०२३ ला पुन्हा नव्या उमेदीने ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले होते. या प्रक्षेपणाच्या आधी सुद्धा चंद्रयान ३ ची छोटी प्रतिकृती बालाजीच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. आता संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयानाच्या लँडिंगकडे लागले आहे. ISRO च्या माहितीनुसार, यान संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.