Chewing Gum Making Process: लहानांपासून थोरल्यांपर्यंत सगळ्यांनाच च्युइंग गम खायला आवडते. च्युइंग गम वापर सामान्यतः लोक माऊथ फ्रेशनर म्हणून किंवा चॉकलेटप्रमाणे खाण्यासाठी करतात. च्युइंग गममुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, असे म्हटले जाते. तर, काही जण तोंडाच्या व्यायामाच्या नावाखाली च्युइंग गम खातात. परंतु, च्युइंग गम कसे बनवले जाते, याची तुम्हाला माहिती आहे का? याचा व्हिडीओ पाहिलात तर पुन्हा कधीच च्युइंग गम खाण्याचा विचारही करणार नाही. च्युइंग गम फॅक्टरीमध्ये कासा तयार होते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून तुमचीही झोप उडेल..

च्युईंग गम आपल्यापैकी अनेकांना आवडतो. अनेकजण त्याचा चाऊन चोथा झाला तरीही चगळतच असतात. सुरुवातीचा गोडवा संपल्यावर उरलेल्या चोथ्याचा फुगा बनवणे हात तर अनेकांच्या आवडीचा विषय. पण, हाच च्युइंग गम कसा बनवतात ते एकदा पाहाच. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, फॅक्ट्रीमधल्या एका मोठ्या सपाट जागेवर कणकीसारखे लगदे ठेवलेले दिसत आहेत. ज्यावर फॅक्टरीतील कर्मचारी अक्षरश: त्यावर उभे आहेत आणि पायानं तुडवत आहेत. ज्यामध्ये त्यांनी पायात काहीच घातलेलं नाहीये. सांगितले जात आहे की, हे कामगार जे लगते तुडवत आहेत ते सर्व च्युइंगमचेच आहेत. व्हिडिमधील निवेदकही कामगार हे काम करत असताना ते आपले पाय स्वच्छ धूत असल्याचा दावा करताना आढळतो.

च्युइंग गम तयार करताना बहुतेक वेळा स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. च्युइंग गम बनवताना कुठेतरी चूक किंवा निष्काळजीपणा नक्कीच होतो. हे सर्व झाल्यावर ते मशीनमध्ये टाकून त्याची माळ तयार केली जाते. मग त्याचे छोटे तुकटे करून पॅकेटमध्ये पॅक केले जाते. अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जेवण टेबलवर आलं, पण दोन घास खाण्याआधीच मृत्यूनं गाठलं; हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ mega_fact या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.