Trending Chimpanzee Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. हे व्हिडीओ त्यांच्या लहान गोंडस पिल्लांचे असोत किंवा जंगलात मजा करत असलेल्या प्राण्यांचे असोत. सर्व प्रकारचे प्राण्यांचे व्हिडीओ पाहणं लोकांना फार आवडतं. काही प्राण्यांचे व्हिडीओ हे इतके विनोदी असतात की ते पाहून लोकांना हसू आवरत नाही. चिंपांझीचा असाच एक विनोदी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चिंपाझी एकाच वेळी अनेक फळे घेऊन येण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. इतके सारे फळं एकाच वेळी घेऊन येण्यासाठी चिंपाझीने जी शक्कल लढवली, ते पाहून तुम्ही अक्षऱशः पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिंपांझी अनेक संत्री घेऊन येताना दिसतोय. इतक्या संत्र्या एकाच वेळी घेऊन येण्यासाठी त्याने काही संत्री आपल्या हातात, आणखी दोन संत्री पायावर आणि एक तोंडात घेऊन येताना दिसत आहे. हातात, पायात संत्री घेऊन चालताना त्रास होत असूनही तो सर्व संत्र्या एकाच वेळी न पाडता घेऊन येतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची गुपचूप शिकार करणार होती सिंहीण, पण संपूर्ण डावच उधळला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या ऋषी सुनक यांचा जुना VIDEO VIRAL, अनेक प्रश्न उपस्थित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेदार व्हिडीओ ‘बुइटेन्ग्बिडेन’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक मजेदार कॅप्शन देखील लिहिली आहे. “या चिंपांझीशी तुम्ही कोणाला जोडू शकता” असा विनोदी प्रश्न करत हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख १८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.