Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2025: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना असते. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर, याच बाप्पाच्या आगमनाची तारीख चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली असून उद्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीतील चिंतामणीचं आगमन आहे. दरम्यान आता या मंडळातर्फे चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’च्या आगमनात मोठा बदल केला आहे.

वाढती गर्दी लक्षात घेता यंदा मंडळान खास महोत्सव’ ॲपवर नोंदणी केली आहे. यामध्ये लाइव्ह आगमन ट्रॅकिंग: चिंतामणीची आगमन मिरवणूक कुठेपर्यंत आली आहे, हे लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे भक्तांनो आगमनाला जाण्याआधी हे नक्की पाहा.

ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:

लाईव्ह आगमन ट्रॅकिंग: चिंतामणीची आगमन मिरवणूक कुठेपर्यंत आली आहे, हे लाईव्ह ट्रॅक करा.

लाईव्ह स्ट्रीमिंग : आगमन लाइव्ह पाहता येईल.

विसर्जन आगमन ट्रॅकिंग: चिंतामणीची विसर्जन मिरवणूक कुठेपर्यंत आली आहे, हे लाईव्ह ट्रॅक करा.

चिंतामणीच्या आगमनासाठी यंदा असं असेल नियोजन

चिंतामणी कलागंध आर्ट्स, परळ मंडपातून बाहेर येईल त्यानंतर बी ए मार्गावर येईल, रुग्णवाहिनीची व्यवस्था, पोलीस व्यवस्था आणि लाइव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. आगमन सोहळ्यात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबत ५ मेडिकल कँम्प असणार आहे. यात दोन डॉक्टर चार नर्स असणार आहे. तसंच ७-८ रुग्णवाहिनी असणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिंतामणी मंडळाचे ६०० कार्यकर्ते असणार आहे. १७ ऑगस्ट २०२५ पासून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. भाविकांना सकाळी ६ ते दुपारी २ आणि संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत दर्शन घेता येईल.

चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक

खरंतर, चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते यावर्षीचा चिंचपोकळीचा चिंतामणी हा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. ज्यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती राजेशाही मराठा वैभवाचे प्रतिबिंबित करते. चिंतामणीची उंची ही सुमारे २१ ते २२ फूट आहे. चिंतामणी पंडालने भव्य प्रवेश मिरवणुकीची १७ ऑगस्ट होणार आहे. ज्यामुळे गणेश चतुर्थी २०२५ च्या उत्सवाची सुरुवात पूर्ण उत्साहात होणार आहे. त्याच्या उंच मूर्ती आणि उत्साही ढोल-ताशा पथकांसाठी ओळखले जाणारे, चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन हे शहरातील उत्सव एक आकर्षण असतं.