chinchpoklicha chintamani aagman sohala 2025 first photo: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. जसजसा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना असते.‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची देखणी मूर्ती पाहायला मिळत आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोहक रुप पाहून भाविकांनी अक्षरश: हात जोडून बाप्पाला नमन केलं. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा १०६ वे वर्ष आहे. १९२० साली या गणपती मंडळाची स्थापना झाली. आगमनाधीश बाप्पा म्हणून या मंडळाची ख्याती आहे.यावर्षीचा चिंचपोकळीचा चिंतामणी हा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. ज्यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती राजेशाही मराठा वैभवाचे प्रतिबिंबित करते.
२२ फुटाची ही मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी केली आहे. आज १७ ऑगस्टपासून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. सायंकाळपासून ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
पाहा चिंतामणीची पहिली झलक
चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक
खरंतर, चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते यावर्षीचा चिंचपोकळीचा चिंतामणी हा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. ज्यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती राजेशाही मराठा वैभवाचे प्रतिबिंबित करते. चिंतामणीची उंची ही सुमारे २१ ते २२ फूट आहे. त्याच्या उंच मूर्ती आणि उत्साही ढोल-ताशा पथकांसाठी ओळखले जाणारे, चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन हे शहरातील उत्सव एक आकर्षण असतं.