आपल्या वडिलांचा अब्जावधींचा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास एका तरुणाने चक्क नकार दिला आहे. हा तरूण चीनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या वांग जियानलिन यांचा मुलगा आहे. वांग जियानलिन यांच्याकडे ६ लाख कोटींची संपत्ती आहे. वांग सिकोंग हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे पण त्यांने मात्र आपल्याला वडिलांच्या व्यवसायात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा : न्यूझीलंडच्या किना-यावर आले विचित्र जीव
वांग सिकोंग हा तरुण चीनमध्ये खुपच प्रसिद्ध आहे. चीनच्या सोशल मिडियावर तर त्याचे लाखो चाहते आहेत. वांग सिकोंगचे वडिल चीनमधली सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण वांगला आपल्या वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नाही. त्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. त्याला आपल्या वडिलांसारखे व्यवसायिक न होता वेगळे आयुष्य जगायचे आहे म्हणून त्याने त्यांच्या अब्जावधीच्या व्यवसायात लक्ष न घालण्याचे ठरवले आहे. वांग सिकोंगकडे जवळपास ३७०० कोटींची संपत्ती आहे.
यावर्षी अॅप्पल आयफोन ७ जगभरात लाँच झाला होता तेव्हा हा वांग सोशल मीडियावर चर्चेत आला होता. कारण त्याने आपल्या लाडक्या कुत्र्याला चक्क आठ अॅप्पल आयफोन भेट म्हणून दिले होते. यातल्या एकाच आयफोनची किंमत जवळपास ६९ हजार रुपये आहे. त्याचे आपल्या कुत्र्यावर खूपच प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच त्याने चक्क आठ आयफोन त्याला भेट म्हणून दिले. त्याच्या लाडक्या कुत्र्याचेही सोशल मीडियावर अकाउंट आहे. याच अकाउंटमधून त्याने फोटो सोशल मीडियावर टाकला होता. आधीही वांगने आपल्या कुत्र्याला अॅपलचे सगळ्यात महागडे घड्याळ दिले होते. वांगने आपली अब्जावधीची संपत्ती नाकारल्याने तो चर्चेत आला. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण चीनमधील अनेक गर्भश्रीमंताची मुले आपला वडिलोपार्जित व्यवसाय नाकरत आहे. शंघाई जयाओटोंग विद्यापीठाने एक सर्वेक्षण केले होते. यात चीनमधील ८० टक्के श्रीमंताची मुले आपल्या कुटुंबियांचा व्यवसाय पुढे चालवायला नकार देत आहेत. या मुलांना त्यापेक्षा हटके करण्यात अधिक रस असतो.