scorecardresearch

Chinese Kali Mandir: काली मातेच्या ‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून दिले जातात नूडल्स; जाणून घ्या यामागचं रंजक कारण

कोलकात्यातील टांगरा भागात एक ‘चीनी काली मंदिर’ आहे. रस्त्यावर वसलेले हे मंदिर तिबेटी शैलीचे आहे.

या मंदिराच्या गल्लीत जुन्या कोलकाता आणि पूर्व आशियातील सुंदर संस्कृतीची झलक पाहायला मिळते. (Photo : Twitter/@ShabanaANI2)

कोणत्याही मंदिरात सहसा लाडू किंवा मिठाई देवाला अर्पण केली जाते. सामान्यतः प्रसादाच्या स्वरूपात फक्त मिठाईच वाटली जाते, परंतु आपल्या देशात असे एक अनोखे मंदिर आहे, जिथे देवाला चायनीज पदार्थ दिले जातात. येथे भाविकांना प्रसाद म्हणून नूडल्सचे वाटप केले जाते. कोलकात्यातील टांगरा भागात एक ‘चीनी काली मंदिर’ आहे. हा परिसर चायना टाउन म्हणून ओळखला जातो. रस्त्यावर वसलेले हे मंदिर तिबेटी शैलीचे आहे. या मंदिराच्या गल्लीत जुन्या कोलकाता आणि पूर्व आशियातील सुंदर संस्कृतीची झलक पाहायला मिळते.

मंदिरात फक्त चायनीज पदार्थच नैवेद्य म्हणून दिले जातात असे नाही, तर येथे लावलेल्या अगरबत्ती देखील चीनच्या आहेत. प्रसादाव्यतिरिक्त येथील सुगंधही इतर मंदिरांपेक्षा वेगळा आहे. एक बंगाली पुजारी मंदिरात पूजा करतो आणि दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी खास प्रसंगी येथे हाताने तयार केलेले कागद जाळले जातात.

Viral Video : मुलीच्या केसांमध्ये अडकलं सापाचं पिल्लू; पुढे जे झालं ते बघून तुम्हालाही बसेल धक्का

Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर

काली मातेच्या या मंदिरात चिनी प्रसाद देण्यामागे एक खास कारण आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी हे मंदिर चिनी आणि बंगाली लोकांच्या देणगीतून बांधले गेले. या ठिकाणी गेल्या ६० वर्षांपासून झाडाखाली देवीची पूजा केली जात होती.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की अनेक वर्षांपूर्वी एक चिनी मुलगा गंभीर आजारी पडला होता. या मुलावर कोणतेही उपचार काम करत नव्हते. एके दिवशी मुलाच्या पालकांनी त्याला तिथे आणले आणि झाडाखाली झोपवले. यानंतर त्यांनी मातेची प्रार्थना केली आणि हा मुलगा चमत्कारिकरित्या बरा झाला. यानंतर हे मंदिर बांधण्यात आले आणि हे मंदिर हिंदू समाजाबरोबरच चिनी समुदायाचेही श्रद्धास्थान बनले.

जेव्हा चिनी लोक मंदिरात येऊ लागले तेव्हा त्यांनीही त्यांच्या संस्कृतीनुसार मातेला अन्नदान करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून इथल्या देवीला नैवेद्य म्हणून नूडल्स, चॉप्स वगैरे अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chinese kali mandir noodles are offered as prasad in this temple find out the interesting reason behind this pvp

ताज्या बातम्या