scorecardresearch

Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर

या क्रॉसिंग ट्रॅकवरून गाड्या कशा जात असतील हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

या ट्रॅकवर चारही दिशांनी गाड्या आल्यावरही त्यांची टक्कर होत नाही. (Photo : Wikipedia)

तुम्ही भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी ऐकल्या असतील, पण भारतात असा एक रेल्वे ट्रॅक आहे, जिथे चारही बाजूंनी ट्रेन येतात हे तुम्हाला माहित आहे का? या अनोख्या गोष्टीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. ज्याला ही गोष्ट पहिल्यांदाच कळते, त्याला धक्काच बसतो. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या ट्रॅकवर चारही दिशांनी गाड्या आल्यावरही त्यांची टक्कर होत नाही.

या रेल्वे ट्रॅकवर टाकलेल्या जाळ्यात अनेक ट्रॅक एकमेकांना ओलांडत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. या दरम्यान या क्रॉसिंग ट्रॅकवरून गाड्या कशा असतील हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. अनेक ट्रॅक एकमेकांना ओलांडतात. ट्रेनच्या रुटनुसार हे ट्रॅक सेट केले जातात. यावर गाड्या आपले मार्ग बदलतात.

दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर मन जिंकणारा व्हिडीओ

याशिवाय रेल्वे रुळांमध्ये एक विशेष प्रकारचा क्रॉसिंग आहे. याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. डायमंड क्रॉसिंग जगात फार कमी ठिकाणी आहे. डायमंड क्रॉसिंगवरून चारही दिशांनी गाड्या जातात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या एवढ्या मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये फक्त एकाच ठिकाणी डायमंड क्रॉसिंग आहे. डायमंड क्रॉसिंग हा एक पॉइंट आहे जिथे रेल्वे ट्रॅक चारही दिशांनी एकमेकांना ओलांडतात.

डायमंड क्रॉसिंग रस्त्याच्या दुभाजका सारखेच दिसते. याला तुम्ही रेल्वे ट्रॅकचे छेदनबिंदू म्हणू शकता. त्यात चार रेल्वे मार्गांचा समावेश आहे. दोन-दोन ट्रॅकच्या हिशोबाने ते एकमेकांना जोडलेले असतात. दिसायला तो हिऱ्यासारखा दिसतो. या कारणास्तव त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. यामध्ये एकाच ठिकाणी चार रेल्वे ट्रॅक दिसतात.

VIDEO: RRR चित्रपटाची क्रेझ; मुलांनी चित्रपटगृहातच केली नाचायला सुरुवात; जबरदस्त डान्स पाहून नेटकरीही झाले खुश

भारतात, फक्त नागपूरमध्ये डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे. त्यात पूर्वेकडील गोंदियाचा एक ट्रॅक आहे, जो हावडा-रौकेला-रायपूर मार्ग आहे. दक्षिणेकडूनही एक ट्रॅक येतो. एक ट्रॅक दिल्लीहून येतो, जो उत्तरेकडून येतो. त्याचवेळी पश्चिम मुंबईतूनही एक ट्रॅक येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diamond crossing india unique railway track even if trains come from all sides there is no collision pvp

ताज्या बातम्या