डान्स ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना आनंद देते. एखादी व्यक्ती जेव्हा सर्वकाही विसरुन डान्स करते तेव्हा अत्यंत आनंदी असते आणि त्यांना पाहून इतरांनाही आनंदच मिळतो. सोशल मीडियावर असे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच दोन तरुणींचा सुंदर डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोघींमध्ये डान्सची जुगलबंदी सुरू असल्याचे दिसते. दोघींचा डान्स व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका कॉलेजमध्ये असल्याचे दिसते. एका मैदानावर विद्यार्थ्यांची गर्दी झालेली दिसत आहे. काही जणांनी पारंपारिक साडी अथवा लुंगी असा दाक्षिणात्य पेहराव परिधान केल्याचे दिसत आहे. मैदानाच्या मध्यभागी दोन तरुणी नाचत आहे. दोन्ही तरुणीने साडी नेसली आहे आणि कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया…या गाण्यावर नाचताना दिसत आहे. एक तरुणीने शास्त्रीय नृत्य करत आहे तर दुसरी पाश्चिमात्य पद्धतीचा डान्स करताना दिसत आहे. दोघींची जुगलबंदी पाहताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहे.

हेही वाचा – Dark chocolate : तुम्हाला डार्क चॉकलेट खायला आवडते? पण ते आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…. 

हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीत फराळ बनवताना फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स अन् बिनधास्त मारा ताव लाडू, चकली, चिवड्यावर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर bhagyalakshmijanardhanan नावाच्या अकांऊटवरून पोस्ट केला आहे. लोकांना शास्त्रीय विरुद्ध पाश्चिमात्य डान्सच्या जुगलबंदीचा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट केली, “पाश्चिमात्य डान्स चांगला आहे पण शास्त्रीय नृत्य ही भावना आहे.” दुसऱ्याने म्हटले, दोघींमध्ये चांगली जुगलबंदी सुरू आहे. अनेकांना शास्त्रीय नृत्य करणाऱ्या तरूणीचा डान्स आवडला आहे.