Dog Vs Cobra Fight Video: साप म्हटलं की, अंगावर शहारा येतो; पण जर समोर कोब्रा असेल, तर परिस्थिती अधिकच धोकादायक बनते. कोब्रा म्हटलं की भले भले हादरतात; मात्र या धोक्याशी दोन हात करताना एका धाडसी कुत्र्यानं आपलं अतुलनीय शौर्य दाखवलं. आता संपूर्ण सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा प्रकार इतका थरारक होता की, बघणाऱ्यांनाही डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण गेलं असेल. नेमकं काय घडलं त्या क्षणी? कोब्रा इतक्या सहजपणे कसा हरला? आणि या कुत्र्याची ही धाडसी कृती कशी झाली कैद? वाचा आणि पाहा तो थरारक VIDEO, जो इंटरनेटवर आश्चर्याचं वादळ निर्माण करीत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक धडकी भरवणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात एका कुत्र्यानं कोब्रा सापाशी थेट भिडून त्याला दोन तुकड्यांत फाडून टाकलं. ही घटना इतकी चकित करणारी आहे की, बघणाऱ्यांना काही क्षणांतच कळून चुकतं हा कुत्रा फक्त पाळीव प्राणी नाही, तर खराखुरा रक्षक आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक कुत्रा आपल्या परिसरात असलेल्या कोब्रा जातीच्या सापाशी भिडतो. सुरुवातीला साप कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो; पण हा कुत्रा काही साधासुधा नसतो. तो त्या लढतीत आपल्या ताकदीबरोबरच कौशशल्याचाही वापर करतो आणि क्षणाचाही विलंब न करता थेट सापावर झेप घेतो. आणि काय सांगावं, काही क्षणांतच त्यानं त्या कोब्र्याचे दोन तुकडे केलेही. कुत्र्यानं आपल्या दातांत सापाला घट्ट पकडलं आणि जबरदस्त झटका देऊन, त्याला दोन भागांमध्ये विभागलं.

हे दृश्य इतकं अंगावर काटा आणणारं आहे की, पाहणारा प्रत्येक जण कुत्र्याच्या धाडसाला सलाम करीत आहे. हा व्हिडीओ @lone_wolf_warrior27 या Instagram पेजवरुन शेअर करण्यात आला असून काही क्षणांतच लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “ही तर खरी शौर्यगाथा आहे.” दुसरा म्हणतो, “सापानं चुकून चुकीच्या घरात प्रवेश केला.”

हा सामना पाहून तुम्हालाही वाटेल, “कधी कधी शांत दिसणाऱ्या प्राण्यातही सिंहाचा आत्मा दडलेला असतो!” हा थरारक VIDEO पाहिला का? नाही पाहिला, तर आता पाहाच, तुमचंही मन धडधडेल.

येथे पाहा व्हिडीओ

महत्त्वाचं: या व्हिडीओच्या सत्यतेबाबत आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मात्र, तो इंटरनेटवर सध्या तुफान गाजतोय, हे नक्की!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.