सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात काही थक्क करणारे असतात. यामध्ये अनेक लोकांचे नाचतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी कॉलेजमध्ये शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. दोघींनी अतिश सुंदर नृत्य सादर केले आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. indian_classical_nrityaa’s आणि indian_art_nritya या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिसत आहे ज्या स्टेजवर शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ‘स्नेहीथने स्नेहीथने’ या प्रसिद्ध तमिळ गाण्यावर या दोन तरुणी नृत्य करताना दिसत. दोघीही इतक्या सुंदर डान्स करत आहे की आसपास उभे असलेले विद्यार्थी नृत्य पाहताना मंत्रमुग्ध झाले आहेत. प्रत्येकजण शांतपणे दोघींच नृत्याचा आनंद घेत आहे.

हेही पाहा “पवन पुत्र हनुमान की जय!” मारुतीरायाला हवेत उडताना पाहून थक्क झाले लोक; काय आहे व्हायरल व्हिडीओचे सत्य?

हेही वाचा – लखनऊचा ‘बर्म्युडा ट्रँगल’ माहितीये का? एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघाताचे व्हिडीओ शेअर करून ‘हा’ युट्युबर कमावतोय पैसे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता आर. माधवन आणि शालिनी यांच्या ‘आलापयुथे’ या तमिळ चित्रपटातील ‘स्नेहीथने स्नेहीथने’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी याच चित्रपटाचा रिमेक म्हणून ‘साथिया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी मुख्य भुमिका साकारली होती. ‘स्नेहीथें स्नेहिथें’ गाण्याचे हिंदी आवृत्ती असलेले “चुपके से चुपके से” हे गाण्याला प्रसिद्धी मिळाली होती. आजही हे गाणे चर्चेत आहे.