उर्फी जावेद हिचे भन्नाट फॅशन प्रयोग पाहून नेटकरी नेहमीच थक्क होतात. कधी तिच्या बोल्ड अवताराचे कौतुक होते तर त्याहून अधिक वेळा तिला टीकेला सुद्धा सामोरे जावे लागते. असं असलं तरी अगदी विचारही न करता येणाऱ्या गोष्टींपासून फॅशनेबल कपडे साकारणे म्हणजे खरोखरोच कला आहे. याच कलेत पारंगत अशी एक इंस्टाग्राम मॉडेल आज आपण पाहणार आहोत. मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील शाहनगर तालुक्यातील सुडोर गावी राहणाऱ्या अपेक्षा राय सोशल मीडियावर तुफान गाजतेय. तिचे फॉलोवर्स तिला पेपर क्वीन म्हणून ओळखतात. याचं कारण काय? चला तर जाणून घेऊयात…

अपेक्षा राय ही सोशल मीडियावर आपले रील्स शेअर देशभरात पोहचली आहे. तिच्या रील्सचे वैशिष्ट्य म्हणजे ती या रील्स मध्ये स्वतः बनवलेले कागदाचे कपडे घालून व्हिडीओ बनवते.

कॉलेजच्या दिवसात तिने शिवणकाम शिकले होते. लॉकडाऊन मध्ये घरी या शिवणकामाचा सराव करताना कापड वाया जाऊ नये म्हणून तिने पेपरवर सर्व सुरु केला आणि यातूनच तिला पेपर ड्रेस संकल्पना सुचली. काहीच वेळात अपेक्षा पेपरचे मोठे गाऊन्स, साडी, लेहेंगा, स्कर्ट आणि बरंच काही बनवू लागली.

अपेक्षाच्या अनेक व्हिडीओजला दहा मिलियनहुन अधिक व्ह्यूज आहेत. तर तिच्या प्रोफाईलला जवळपास २ लाख फॉलोवर्स आहेत.

अपेक्षाने आपण बनवलेले कपडे जगासमोर आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. यात तिच्या आई वडिलांनी व बहिणीने खूप साथ दिल्याचे सुद्धा ती सांगते.

तिने एक डोळा मारला अन.. सेलिब्रिटींना टाकलं मागे; पहा नाशिकच्या लिटिल स्टारचे Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपेक्षाचे युट्युब चॅनेल सुद्धा आहे. युट्युब वरूनच एडिटिंग शिकून ती आपले इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडिया सुद्धा चालवते.अपेक्षाची स्वप्न मोठी आहेत, सोशल मीडियाचा वापर आपल्यातील वेगळेपण जगासमोर दाखवण्यासाठी करणे हे तिचे ध्येय आहे. भविष्यात फॅशन डिझाईनिंग करून स्वतःची ओळख तयार करणे अशी अपेक्षाची इच्छा आहे.