काय कसं चाललायं तुमचं क्वारंटाइन? खाणंपिणं आणि आराम करणं आणि जमलचं तर मित्र मैत्रिणींबरोबर व्हिडिओ कॉल. बरोबर ओळखलं ना? करोनामुळे सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेकांचा हाच दिनक्रम झाला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये डेटींग अ‍ॅपवरील ट्रॅफिक वाढली आहे. मात्र एका डेटिंग अ‍ॅपवर एका मुलाची फसवणूक झाली मात्र ही फसवणूक त्याच्या पथ्यावर पडल्याची आगळीवेगळी घटना समोर आली आहे. तशा क्वारंटाइनच्या कालावधीमध्ये अनेक प्रेम कहाण्या समोर आल्या असल्या तरी या मुलाबरोबर झालेल्या फसवणुकीमधून घडलेली प्रेम कहाणी सर्वात हटके आहे असंच म्हणावं लागेल. नाहीतर डेटिंग अ‍ॅपवर समोरच्या मुलीने मुद्दाम चुकीचा नंबर दिला आणि तो थेट एका अभिनेत्रीचा फोन नंबर निघाला हे एखाद्या चित्रपटात घडू शकतं नाही का?

तर झालं असं की माईक नावाच्या एका मुलाला डेटिंग अ‍ॅपवर एका मुलीने चुकीचा फोन नंबर दिला. काही दिवसांनी या मुलाने त्या क्रमांकावर मेसेज पाठवला आणि तो क्रमांक चुकीचा असल्याचा मेसेज समोरुन आला. या मुलाने हा क्रमांक कोणाचा आहे याबद्दल चौकशी केली तर तो चक्क एका अभिनेत्रीचा क्रमांक निघाला. या मुलाचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही अखेर या अभिनेत्रीने त्याला सेल्फी काढून पाठवल्यावरच या मुलाचा घडलेल्या प्रकारावर विश्वास बसला. या सर्व गोष्टीची माहिती @codeiehiger या ट्विटर अकाऊंटवरुन या तरुण अभिनेत्रीनेच दिली आहे. तिने या अनोळखी मुलाबरोबरच्या संवादाचे काही स्क्रीनशॉर्ट शेअर करत नक्की काय काय घडलं हे सांगितलं आहे.

बरं ही गोष्ट संवादापर्यंतच थांबली नाही तर हे दोघे एका व्हच्यूअल डेटवरही गेले होते. अनेक वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यांचा संवाद कसा सुरु झाला तुम्हीच बघा…



या संवादानंतर त्यांनी एकमेकांना फोटो पाठवले आणि फेसटाइमवरुनही संवाद साधला. यासंदर्भातही या अभिनेत्रीनेच ट्विटवरुन फोटो शेअऱ करत माहिती दिली.

ते गप्पा मारु लागले आणि एमेकांच्या प्रेमात पडले. “तो माझ्या टाइपचा मुलगा आहे” म्हणजेच मी जसा मुलगा शोध होते तसाच तो आहे असंही या अभिनेत्रीने ट्विट केलं आहे.

त्यानंतर कोडीने एकमेकांना पाहिल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या व्हच्यूअल डेटला जात असल्याचेही तिच्या चाहत्यांना ट्विटवरुन सांगितलं. तिने डेटसाठी केलेल्या खास पेहरावाचा फोटोही ट्विट केला होता.

त्याच्याबरोबरची डेट नक्की कशी झाली याबद्दलही कोडीने एका ट्विटर थ्रेडमध्ये सांगितलं आहे.

अर्थात ही जगावेगळी प्रेमकथा पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अनेकांनी या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी या प्रेमकथेवर आपला विश्वासच बसत नसल्याचे म्हटले आहे. तर काहींंनी या प्रेमकथेला love in the time of corona प्रकारची प्रेमकथा असल्याचे म्हटलं आहे.