Couple Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. मग साहजिकच कित्येकदा अशा व्यक्तींना प्रत्यही जीवालाही मुकावं लागतं. असाच एक स्टंटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कपलने रील बनवण्यासाठी चक्क पाण्यात उडी मारली आहे.
काही मंडळींना स्टंटबाजीची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस त्यांच्या अंगाशीसुद्धा येते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणीसोबत घडला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कुठेही असे जीवावर बेतणारे स्टंट करणाऱ्या लोकांना नक्कीच कधी ना कधी धडा मिळतो. त्याबाबतची बऱ्याचदा आपल्याला समोर आलेल्या व्हिडीओंद्वारे मिळत असते.
व्हिडीओमध्ये तुम्ही एका कपलला पुलावर उभं राहिलेलं पाहू शकता. आणि मग ते दोघं एकमेकांना मिठी मारून वाहत्या नदीमध्ये उडी मारतात.नदीला फारसं पाणी नाही, आणि दोघांनाही पोहता येत होतं त्यामुळे ते बचावले मात्र त्यामुळे थोड्याच वेळात ते दोघं पोहत किनाऱ्यावर येतात.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @imnatasha09 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.