Viral video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल याची काहीच कल्पना नसते. त्यातच हल्ली सामाजिक स्तरावरील जीवनही फार विचित्र झाले आहे. त्यामुळेच अनेकदा रस्त्यावर काहीतरी अनोखे किंवा चुकीचे घडताना दिसले की लोक ती घटना कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. मग तो व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि व्हायरल होतो. यातील काही व्हिडिओंचे कौतुक होते तर काहींवर टीका होते. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक संतापले आहेत.

सोशल मीडियावर हल्ली असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहताना आपल्याला लाज वाटते. यात जोडपे ठिकाण, वेळ न बघता कुठेही अश्लील कृत्य करताना दिसतात, जे पाहताना दुसऱ्यांना लाज वाटते. मागील काही दिवसांपासून दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोत अशाचप्रकारे कपल अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात आता एका आकाश पाळण्यातला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कपलने अक्षरश: सगळी मर्यादा ओलांडत चक्क आकाश पाळण्यात रोमान्स सुरु केलाय . हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आणि तरुणी आकाश पाळण्यात बसून रोमान्स करत आहेत. यावेळी बॉयफ्रेंड तरुणीला किस करताना दिसत आहे. आजूबाजूला आपल्याला सगळे बघत आहेत तरीही या दोघांना त्याचं भान नाहीय.

पाहा व्हिडीओ

कठोर कारवाई करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करावी. ही कारवाई सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित, व्यवस्थित आणि एकमेकाबद्दल सन्मान बाळगत कसं आचरण असावं हे दर्शवणारी असावी,” अशा मागण्या नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर एकानं “अरे जरा तरी लाज ठेवा” अशी प्रतिक्रिया देत टिका केली आहे.